suspicious liqour sakal
देश

दारू प्यायल्याने आणखी सहा जणांचा मृत्यू, मृतांची संख्या २४ वर

सकाळ डिजिटल टीम

पाटणा : बिहारमधील गोपालगंज आणि पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात दारू प्यायल्याने (suspicious liquor incident bihar) गेल्या दोन दिवसांत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण आजारी पडले आहेत. ही दारू बनावट आणि विषारी असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, दारूमध्ये काय होते हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही.

पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील बेतिया जवळील तेल्हुआ गावात दारू प्यायल्याने ८ जण दगावले, तर गोपाळगंज येथे मृतांची संख्या ६ ने वाढून १६ वर पोहोचली आहे. मात्र, अद्यापही दोन्ही जिल्हा प्रशासनाकडून मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट केले नाही. दरम्यान, अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर बिहारचे मंत्री जनक राम यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच विषारी दारू प्यायल्यामुळे या लोकांचा मृत्यू झाला आहे. एनडीए सरकारला बदनाम करण्यासाठी कोणतरी हे षडयंत्र रचल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

''गेल्या दोन दिवसांत मुहम्मदपूर गावात काही लोकांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. अद्यापही शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नसून तो आल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. तसेच या घटनेच्या तपासासाठी तीन टीम तयार करण्यात आल्या आहेत, असं गोपालगंजचे वरिष्ठ पोलिस अधिकारी आनंद कुमार यांनी NDTV सोबत बोलताना सांगितले.

२० पेक्षा अधिक लोकांनी परिसरात स्थानिक व्यापाऱ्यांद्वारे विकल्या जाणार्‍या बनावट दारूचे सेवन केले होते. त्यापैकी काही जणांचा आधीच मृत्यू झाला. त्यानंतर चार लोकांचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेताना जीव गेला. प्रथमदर्शनी हे मृत्यू विषारी द्रव्य प्राशन केल्याने झाल्याचे दिसत असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना असून दहा दिवसांपूर्वी उत्तर बिहारमध्ये अशीच एक घटना घडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT