mobile
mobile Sakal
देश

अल्पवयीन मुलीची आत्महत्या अन् 255 मिस्ड कॉल; हैराण करणारी घटना

सकाळ डिजिटल टीम

राजस्थान : विषारी औषध पिऊन आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर एकाच क्रमांकावरून तब्बल 255 मिस्ड कॉल आल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, त्यानंतर पोलीस आता या क्रमांकाच्या माध्यमातून आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, याच नंबरवरून आपल्यालादेखील फोन करून धमकावण्यात आल्याचे अल्पवयीन मुलीच्या भावाने सांगितले आहे. याप्रकरणी बांसवाडा जिल्ह्यातील अंबापुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, मिस्ड कॉल करणाऱ्या व्यक्तीचा या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येमागे काही हात आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. (Minor Girl Committed Suicide In Udaipur District )

नेमकी घटना काय?

अल्पवयीन मुलीचा भाऊ आणि वडील काही कामानिमित्त बांसवाडा येथे गेले होते, त्यावेळी गावातील एका व्यक्तीने मुलीच्या वडिलांना त्यांच्या मुलीने विष प्राशन केल्याचे फोन करून सांगितले. त्यानंतर मुलीचा भाऊ आणि वडिल ज्यावेळी घरी पोहोचले त्यावेळी मुलीच्या तोंडातून फेस येत होता. तिला तत्काळ रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, तपासामध्ये मुलीकडे असणाऱ्या मोबाईलमध्ये एकाच नंबर वरून तब्बल 255 मिस्ड कॉल आले होते. तसेच फोन करणारी व्यक्ती आपल्या बहिणाला नेहमी त्रास देत होता आणि त्याचमुळे आपल्या बहिणीने आत्महत्या केल्याचे मुलीच्या भावाचे म्हणणे आहे. तसेच याच नंबरवरून आपल्यालादेखील फोन करून धमकी देण्यात आल्याचे मुलीच्या भावाने सांगितले आहे. महिनाभरापूर्वी आपल्यालाही याच नंबरवरून फोन आला होता तसेच आपल्याला कटुंबी गावात बोलावण्यात आले होते. तेथे आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली होती असे त्याने सांगितले.

मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

दरम्यान, घटनेवेळी पोलिसांना अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून, त्यात छोटी सरवण येथे राहणारा आशिक उर्फ​आसू नावाचा मुलगा आपल्याला फोनवर मारून पळवून नेण्याची धमकी देत असल्याचे नमुद करण्यात आले आहे. याशिवाय पंधरा दिवसांपूर्वीही त्याने घराजवळ येत धमकी दिल्याचे चिठ्ठीत उल्लेख करण्यात आला आहे. याच त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे यात लिहिण्यात आले असून त्यात आरोपीचा मोबाईल क्रमांकही नमूद करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT