it jobs
it jobs 
देश

2022 मध्ये IT क्षेत्रातील 30 लाख लोकांचा जॉब जाणार- रिपोर्ट

कार्तिक पुजारी

एका रिपोर्टनुसार, 2022 मध्ये आयटी क्षेत्रातील तब्बल 30 लाख कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागेल, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

नवी दिल्ली- भारतीय आयटी क्षेत्रामध्ये मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. एका रिपोर्टनुसार, 2022 मध्ये आयटी क्षेत्रातील तब्बल 30 लाख कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागेल, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ऑटोमेशन होत आहे. विशेष करुन टेक-स्पेस, सॉफ्टवेअर कंपन्या मोठ्या प्रमाणात ऑटोमेशन स्वीकारत आहेत. रिपोर्टनुसार, डोमेस्टिक सॉफ्टवेअर कंपनीतील 1.6 लाख कर्मचाऱ्यांपैकी 30 लाख लोकांना घरचा रस्ता दाखवला जाईल. यातून या क्षेत्राची वार्षिक 100 अब्ज डॉलरची बजत होईल, असं सांगण्यात आलंय.

Nasscom च्या माहितीनुसार, डोमेस्टिक आयटी क्षेत्रामध्ये जवळपास 1.6 कोटी लोक काम करतात. त्यातील 90 लाख कर्मचारी कमी कौशल्य असलेले आणि बीपीओमध्ये काम करणारे आहेत. यातील 30 टक्के किंवा 30 लाख कर्मचारी 2022 मध्ये आपली नोकरी गमावतील. आयटी क्षेत्रामध्ये झालेल्या रोबोट प्रोसेस ऑटोमेशनचा robot process automation (RPA) हा परिणाम असेल असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. जवळपास 7 लाख लोकांचे काम RPA करु लागतील आणि तंत्रज्ञानातील अद्यावतीकरणामुळे इतरांच्या काम करण्याची आवश्यकता लागणार नाही.

RPA चा सर्वात मोठा परिणाम अमेरिकेतील कर्मचाऱ्यांवर झाला आहे. ऑटोमेशनमुळे अमेरिकेत 10 लाख कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आले. पुढील काळात ऑटोमेशनमुळे आयटी क्षेत्रात आमुलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. आत्ताच याचे संकेत मिळत आहेत. ऑटोमेशनमुळे कंपन्यांचा आर्थिक फायदा वाढणार आहे. शिवाय ऑटोमेशनमुळे 24 तास काम शक्य होणार आहे. याचा परिणाम थेट कंपन्यांच्या उत्पन्नावर होईल.

TCS, Infosys, Wipro, HCL, Tech Mahindra ,Cognizant आणि इतर कंपन्या RPA कौशल्यामुळे 30 लाख मॅनपॉवर कमी करण्याच्या तयारीत आहे. यामुळे त्यांना 100 अब्ज डॉलर वाचवता येतील. याचा वापर ते आणखी ऑटोमेशन वाढवण्यासाठी करु शकतात. दरम्यान, 1998 मध्ये आयटी क्षेत्राचा जीडीपीतील वाटा 1 टक्के होतो, पण आता तो वाढून 7 टक्के झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT