3.4-magnitude earthquake shakes Assam 
देश

भारत-बांगलादेश सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत-बांगलादेश सीमावर्ती भागात आज सकाळी ७ वाजून १० मिनीटांनी भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. रिश्टर स्केलवर हे भूकंपाचे धक्के ४.३ एवढ्या तीव्रतेचे होते, अशी माहिती भूकंपविज्ञान केंद्राने दिली आहे. याबाबतचे अधिकृत वृत्त एएनआयने दिले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी (ता. १० एप्रिल) रोजी नवी दिल्लीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल असल्याची माहिती भूकंपविज्ञान केंद्राकडून देण्यात आली होती. दिल्ली आणि नजीकच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.५ होती. या भूकंपाचं केंद्र दिल्ली आणि उत्तर प्रदेशनजीकच्या सीमाभागात होते. त्यानंतर आज बांगलादेश आणि भारताच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपात कुठलीही हानी झाल्याची बातमी मिळालेली नाही. दिल्लीतील भूकंपाच्या धक्यांपेक्षा भारत-बांगलादेश सीमावर्ती भागातील भूकंपाची तीव्रता ही थोडी कमी होती.

दरम्यान, कोरोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करत असतानाच एका आणखी एका नैसर्गिक संकटानं महाराष्ट्राच्या दारावर थाप मारली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच किनारपट्टीला सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, वादळाआधीच मंगळवारी रात्रीपासून किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT