देश

कर्नाटकात काँग्रेस आमदारांना 40 कोटींची 'ऑफर' 

वृत्तसंस्था

बंगळूर : भाजपकडून काँग्रेस आमदारांना 30 ते 40 कोटी रुपयाचे आमीष दाखविण्यात येत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, कॉंग्रेसचे 11 आमदार मुंबईत एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. 

विधिमंडळाबाहेर असलेले सर्व आमदार आज सायंकाळपर्यंत परत येतील असे सांगून सिद्धरामय्या म्हणाले, ""गेल्या काही महिन्यांपासून भाजपचा ऑपरेशन कमळचा प्रयत्न सुरू आहे. सुमारे 20 आमदारांना प्रत्येकी 30 ते 40 कोटी रुपये देण्याचे आमीष दाखविले आहे. भाजपकडे एवढा पैसा आला कोठून, असा त्यांनी प्रश्‍न केला. 

आमदारांना आमीष दाखविल्याचा आपल्याजवळ पुरावा असल्याचे सांगून वेळ येताच तो जाहीर करण्याचीही त्यांनी ग्वाही दिली. युती सरकार भक्कम असून, कार्यकाल पूर्ण करेल. पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई करता येते, याचा अभ्यास करण्यात येत आहे, असे ते म्हणाले. उद्या (ता. 8) कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.

बैठकीत भाग घेण्यासाठी पक्षाचे सर्व आमदार आज सायंकाळपर्यंत बंगळुरात परततील. बैठकीला उपस्थित न राहणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा त्यांनी या वेळी इशारा दिला. दरम्यान, उद्याच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आणखी पाच आमदार मुंबईला जाणार असल्याचे वृत्त आहे. 

11 आमदार मुंबईत 

कॉंग्रेसचे 11 आमदार मुंबईतील हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील युती सरकारसमोर नवे संकट उभे राहिले आहे. माजी मुख्यमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांचे पुत्र विजयेंद्र असंतुष्ट आमदारांसोबत असल्याचे समजते.

एकीकडे भाजपच्या ऑपरेशन कमळने जोर धरलेला असतानाच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्पाच्या तयारी बरोबरच ऑपरेशन कमळच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार व उपमुख्यमंत्री जी. परमेश्‍वर असंतुष्ट आमदारांशी संपर्क साधून त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: झारखंडमध्ये स्कूलबसचा मोठा अपघात

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT