Bolero Accident in Mysore District esakal
देश

कर्नाटकात भीषण अपघात; लग्न संपवून परतताना 6 जणांवर काळाचा घाला, 9 जखमी

सकाळ डिजिटल टीम

हुन्सूर तालुक्यातील कल बेट्टा रोडवर भीषण अपघात झाला आहे.

बंगळुरु (कर्नाटक) : म्हैसूर जिल्ह्यातील (Mysore Karnataka) हुन्सूर तालुक्यातील कल बेट्टा रोडवर भीषण अपघात झालाय. बोलेरो वाहन झाडावर आदळल्यानं 6 जण जागीच ठार झाले. तर, जखमींना म्हैसूरच्या केआर रुग्णालयात (KR Hospital Mysore) दाखल करण्यात आलंय. या वाहनातून एकूण 9 जण प्रवास करत होते आणि 6 जणांचा अपघातात मृत्यू झालाय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चालक संतोष (42), अनिल (44), बाबू (48), राजेश (40), दयानंद (42) आणि विनीत (37) हे पालीबेट्टा येथील रहिवासी आहेत. हुनसूर इथं लग्नाला जावून पालीबेट्टा इथं परत येताना झाडाला बोलेरो वाहन धडकून भीषण अपघात झाल्यानं हा अपघात झाला आहे.

या अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थ आणि पोलिसांनी पाहणी करुन जखमींना म्हैसूरच्या केआर रुग्णालयात दाखल केलंय. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. दरम्यान, पोलिसांनी (Mysore Police) घटनास्थळी पाहणी करुन अधिक तपास सुरु केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT