6 people died in a road accident in Jamshedpur Jharkhand after their car hit the divider new year  
देश

Accident News : 'न्यू इयर पार्टी' ठरली अखेरची! भीषण अपघातात सहा मित्र जागीच ठार

नवीन वर्ष आगमनाची पार्टी करून परतणाऱ्या मित्रांच्या गाडीला हा भीषण अपघात झाला असून यामध्ये सहा जण दगावले आहेत, तर दोघे जखमी आहेत.

रोहित कणसे

जगभरात नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहत करण्यात येत आहे. मात्र नव्या वर्षाच्या पहिल्याचं दिवशी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका भीषण रस्ता अपघातात सहा मित्रांचा मृत्यू झाला आहे. घटना झारखंड येथील बिष्टुपूर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्किट हाउस भागात झाली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रिपोर्टनुसार, वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती पहिल्यांदा डिव्हायडला धडकली आणि नंतर एका झाडावर आदळून उलटली. या कार दुर्घटनेत कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. धडक इतकी जबरदस्त होती की, याचा आवाज खूप दूरपर्यंत ऐकू आल्याने लोक घरातून बाहेर धावत आले.

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले, तसेच जखमींना बाहेर काढण्यात आलं. पोलिसांकडून हे तरूण कुठे पार्टी करण्यासाठी गेले होते याचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या वर्षाच्या स्वागताची पार्टी करून हे तरूण घरी परतत असताना ही घटना घडली. रिपोर्ट्सनुसार कारमध्ये बसलेले सर्व तरुण दारूच्या नशेत होते. सकाळ होताच घटनास्थळी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान मृतदेहांना कारमधून बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. सर्व मृत तरुण हे आरआयटी पोलिस स्टेशन हद्दीतील कुलुप्तांग येथील आहेत.

या अपघातात जखमी झालेल्या रविशंकर याच्या वडिल सुनील झा यांनी सांगितले की या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे पण त्यांचा मुलगा बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहानामध्ये आठ जण प्रवास करत होते. ज्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण बचावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मृणाल दुसानिसने अमेरिका का सोडली? सांगितलं खरं कारण; म्हणाली, 'आमचं नवीन लग्न झालेलं तेव्हा...'

Toxic Cough Syrup: पेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकलचा खोकल्याच्या औषधात वापर? १४ हुन अधिक मुलांचा मृत्यू

Fadnavis Interview: मोदींना आंबा, तर फडणवीसांना संत्रा… अक्षय कुमार पुन्हा ट्रोल; मुख्यमंत्र्यांनी दिलं भन्नाट उत्तर!

ऐश्वर्याचं सुपरहिट 'कजरा रे' गाणं गाणाऱ्या गायिकेला मिळालेलं निव्वळ इतकं मानधन; म्हणाली "माझी किंमत नाही"

Leopard Attack Sangli : आजोबांसोबत शेतात गेलेल्या ४ वर्षीय आरववर बिबट्यानं मारला पंजा अन्.., नातवाला वाचवण्यासाठी आजोबा बनला 'छावा'

SCROLL FOR NEXT