6031 loudspeakers removed from religious sites in utter Pradesh  
देश

यूपी सरकारची मोठी कारवाई, धार्मिक स्थळांवरून काढले ६,००० भोंगे

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात हनुमान चालिसा आणि धार्मिक स्थळांवर भोंगे यावर वाद सुरु असाताना उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरच्या वापराबाबत सरकारी नियमांचे पालन करण्यासाठी राज्यव्यापी मोहिमेत सुरू केली आहे, या अंतर्गत गेल्या 72 तासांत विविध समुदायांच्या धार्मिक स्थळांवरून तब्बल 6,031 लाऊडस्पीकर काढून टाकण्यात आले. याशिवाय 30,000 लाऊडस्पीकरचा आवाज निर्धारित डेसिबलच्या पातळीनुसार कमी करण्यात आला.

अलीकडेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकार्‍यांना धार्मिक स्थळांवर पूर्वपरवानगीशिवाय पब्लिक अॅड्रेस सिस्टीम बसवली जाणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आणि ज्या ठिकाणी लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी आहे त्या ठिकाणीच्या बाहेर आवाज जाणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशांत कुमार, एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) यांनी सांगितले की सर्व एसएचओना आदेशाचे पालन करण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणाहून लाऊडस्पीकर काढणे आणि आवाज कमी करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या दरम्यान महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविषयी भूमिका घेत ३ तारखेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा असा अल्टिमेटम महाराष्ट्र सरकारला दिला आहे, अन्यथा मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा पठण केले जाईल असा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT