गुवाहटी - आसाम पोलिसांसमोर गुरुवारी ६४४ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. या वेळी नक्षलवाद्यांनी शस्त्रेही पोलिसांकडे जमा केली.
गुवाहटी - आसाम पोलिसांसमोर गुरुवारी ६४४ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. या वेळी नक्षलवाद्यांनी शस्त्रेही पोलिसांकडे जमा केली. 
देश

आसाममध्ये ६४४ नक्षलवादी शरण

पीटीआय

गुवाहटी - आसाममध्ये आज ६४४ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. या वेळी १७७ शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतले. उल्फा, एनडीएफबी, आरएनएलएफ, केएलओ, भाकपा (माओवादी), एनएसएलए, एडीएफ आणि एनएलएफबीच्या नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत शरणागती पत्करली. 

या वेळी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले, की तुम्ही (शरणागती पत्करलेले नक्षलवादी) आसामच्या विकासासाठी मुख्य प्रवाहत आल्याने नागरिक आनंदी आहेत. लोकशाहीवर विश्‍वास ठेवणाऱ्या लोकांना तुम्ही प्रेरणा दिली आहे. मुख्य प्रवाहाबाहेर असलेल्या नागरिकांनी पुढे यावे आणि देशाला बळकट करावे, असे आवाहन सोनोवाल यांनी केले. दरम्यान, १७७ शस्त्रे, ५८ मॅगझिन, १.९३ किलो स्फोटकांचा साठा, ५२ ग्रेनेड, ७१ बाँब, तीन रॉकेट लाँचर्स, ३०६ डिटोनेटर्स, १७ कुकरी आणि दोन रेडिओ सेट नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या हवाली केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT