Money esakal
देश

मोदी सरकारचं नववर्षाचं 'गिफ्ट', ३२ लाख खात्यात २ लाखांपर्यंतची रक्कम?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (Central Govt) 31 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लवकरच नव्या वर्षी एक बंपर गिफ्ट (New Year Gift) मिळू शकतं. केंद्र सरकार याच महिन्यामध्ये महागाई भत्ता अर्थात डीए (DA) जमा करु शकते. सरकार गेल्या 18 महिन्यांपासून अडकलेला हा भत्ता एकसाथ जमा करण्याच्या तयारीत आहे. जर असं झालं तर येणाऱ्या काही दिवसांमध्येच केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Govt Employees) एकावेळीच दोन लाख रुपयांहून अधिक मोठी रक्कम एकावेळीच हाती पडू शकते.

18 महिन्यांपासून पेंडींग आहे महागाई भत्ता

एका सरकारी रिपोर्टनुसार, एक मार्च 2019 रोजी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या 31.43 लाख होती. कोरोनाची महासाथ आल्यानंतर डिए जमा करण्याची प्रक्रिया गेल्या 18 महिन्यांपासून पेंडिंग आहे. ताज्या बातम्यांनुसार, केंद्र सरकार या कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचा थकीत डीए या महिन्यातच देऊ करणार आहे. जर 18 महिन्यांचा हा डिए जमा करण्यात आला तर अनेक कर्मचाऱ्यांना एका वेळीच दोन लाखांहून अधिक रक्कम खात्यात जमा होऊ शकते.

डीए, डीआर, कॉम्पेन्सेशन वाढणार?

डीए आणि डीआर याबाबत सेंट्रल कॅबिनेटच्या पुढील बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो. याशिवाय कॉम्पेन्सेशन देखील वाढवण्याच्या तयारीत सरकार आहे. या सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डीए आणि डीआर वाढवून तो 17 टक्क्यांवरुन 31 टक्के केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

CM Devendra Fadnavis: उद्योगांत महाराष्ट्र अव्वलच, 'कंपन्या बंद'चा दावा चुकीचा; फडणवीस यांचा विश्वास

आज शूटिंगचा शेवटचा दिवस... झी मराठीची मालिका अवघ्या ७ महिन्यात घेणार निरोप; मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना धक्का

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

IND vs SL 1st Test: परदेशात फडकला तिरंगा, राष्ट्रगीताने भारावलं गॉलचं मैदान; शुभमन गिलसह टीम इंडियाचा VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT