देश

सरकारकडून 8 कोटी मोफत एलपीजी गॅस जोडणी : पंतप्रधान

वृत्तसंस्था

औरंगाबाद : ज्यांना चूल आणि त्यांच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे, या सर्वांचे अभिनंदन करतो. मागील वर्षात मार्च महिन्यात आठ कोटी लक्ष्य करण्यात आले होते. त्यासाठी सरकारकडून व्यापक काम करण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच सरकारच्या या योजनेतून 8 कोटी मोफत एलपीजी सिलिंडर देण्यात आले, असेही ते म्हणाले. 

राज्यस्तरीय सक्षम महिला मेळाव्याचे आयोजन औरंगाबाद येथे करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, औरंगाबाद शहर नवे स्मार्ट सिटी बनत आहे. हे शहर देशातील व्यापाराचे मोठे केंद्र लवकरच होणार आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी याठिकाणी काम सुरु केले आहे. येत्या काही दिवसांत आणखी काम केले जाणार आहे. 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजनें'तर्गत 8 कोटी मोफत एलपीजी गॅसची जोडणी करण्यात आली. ज्यांना धुरापासून मुक्ती मिळाली आहे. या सर्वांचे अभिनंदन करतो. सरकारकडून मोठ्या पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, गावांत एलपीजी देण्यात आले. गॅस सिलिंडरचा तुटवडा होऊ नये, यासाठी पुरवठ्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. ज्यांच्या घरी एलपीजी कनेक्शन नाही, असे एकही घर राहता कामा नये, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. येत्या काळात सर्व घरात पाईपलाईनद्वारे गॅस देण्याचा प्रयत्नही सरकारकडून केला जाणार आहे. 

सर्व माता-भगिणींना माझा नमस्कार

सर्व माता-भगिणींना माझा नमस्कार. उमाजी नाईक यांची जयंतीसुद्धा आज आहे. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो, असे उद्गार त्यांनी मराठीतून काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT