रशियात गोळीबार sakal
देश

रशियात गोळीबारात ८ ठार

जीव वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी खिडकीतून मारल्या उड्या

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को ः रशियाच्या पर्म येथील वैद्यकीय विद्यापीठात सोमवारी गोळीबार झाला. ‘रॉयटर’च्या माहितीनुसार यात आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. ‘पर्म’मधील आरोग्य अधिकाऱ्यांनी मात्र या गोळीबारात दहापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. या घटनेनंतर हल्लेखोराला ठार करण्यात सांगण्यात आले होते. पण या घटनेची चौकशी करणाऱ्या समितीने तो जिवंत असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती दिली.

गोळीबार करण्यामागील कारण समजू शकलेले नाही. गोळीबार होताना भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी जीव वाचविण्यासाठी सभागृहांमध्ये कोंडून घेतले तर काहींनी खिडकीतून उड्या मारल्या, अशी माहिती रशियाच्या ‘तास’ या वृत्तसंस्थेने दिली. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. उड्या मारणाऱ्यांपैकी काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर परिसरात नाकाबंदी करून तपास सुरू झाला आहे. सावधगिरी म्हणून सैबेरियातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे.

हल्लाआधी केले ट्विट

हल्लेखोराची ओळख पटली असून तो विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचा दावा समितीने केला आहे. त्याचवेळी स्थानिक माध्यमांच्या दाव्यानुसार १८ वर्षांच्या विद्यार्थ्याने हा गोळीबार केला. त्याने रायफल व दारूगोळ्यासह छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले होते. ‘‘मी याबाबत दीर्घकाळ विचार करीत होतो. खूप वर्षे झाली आहेत आणि मला जाणवले आहे की, मी जे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे,’’ असा मजकूरही हल्लेखोराने छायाचित्राबरोबर लिहिला आहे. संबंधित हल्लेखोर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून आत येताना बंदुकीत गोळ्या भरत असलेले दृश्‍य एका व्हिडिओत दिसला आहे. हल्लेखोराने अत्याधुनिक बंदुकीतून गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय विद्यार्थी सुरक्षित

मॉस्कोपासून तेराशे किलोमीटर दूर असणाऱ्या पर्ममधील लोकसंख्या सुमारे दहा लाख असून येथील विद्यापीठात १२ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यापीठात शिकणारे सर्व भारतीय विद्यार्थी सुरक्षित असल्याचे भारतीय दूतावासाने सांगितले. ‘‘ पर्म विद्यापीठातील भयानक हल्ल्याने धक्का बसला. त्यातील मृतांना आम्ही श्रद्धांजली वाहतो,’’ असा संदेश दूतावासाने ट्विटवर दिला आहे. भारतीय विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी व स्थानिक अधिकाऱ्यांचा आम्ही संपर्कात आहोत. विद्यापीठातील सर्व भारतीय विद्यार्थी सुरक्षित असल्याचेही दूतावासाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT