देश

उद्धव ठाकरे टॉप पाचमध्ये, पहिल्या 11 मध्ये भाजपचे दोन मुख्यमंत्री

नामदेव कुंभार

Mood of the Nation Poll : देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या दहांमध्ये भाजपचा फक्त एक मुख्यमंत्री आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पहिल्या पाचमध्ये आहेत. ‘इंडिया टुडे’च्या ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्व्हेत देशातील सर्वाधिक लोकप्रिय 11 मुख्यमंत्र्यांच्या नावांची यादी प्रसारित करण्यात आली आहे. या 11 मुख्यमंत्र्यांमध्ये फक्त भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना स्थान मिळाले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराईन विजयन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळाले आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा (Himanta Biswa Sarma) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दोन्ही मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. योगींना या सर्व्हेत फक्त 29 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही या यादीत समावेस आहे.

मोदींच्या लोकप्रियतेत घट -

‘इंडिया टुडे’च्या या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेतही मोठी घट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत वर्षभरात 66 टक्केंनी घट झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये 38 टक्के, तर ऑगस्ट 2020 मध्ये 66 टक्के लोकांनी मोदींना पसंती दर्शविली होती. या महिन्यात केवळ 24 टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT