Arvind Kejriwal
Arvind Kejriwal eSakal
देश

Manish Sisodia : मनीष सिसोदियांच्या अटकेनंतर आपची प्रतिक्रिया; म्हटलं आम्हाला...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीबीआयने ही कारवाई केली आहे. यावर आता आम आदमी पक्षाकडून प्रतिक्रिया आली आहे.

मनीष सिसोदिया यांना अटक होईल, हे आम्हाला नेहमीच माहित होते. आपचे आमदार सौरभ भारद्वाज म्हणाले, "सीबीआय पूर्णपणे केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत आहे. मनीष सिसोदिया यांना अटक होणार हे आम्हाला आधीच माहीत होते. तसेच तपास यंत्रणा कशा प्रकारे काम करतात हे दुःखद आणि अंदाज करण्यासारखे आहे.

केंद्राकडून सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा 'आप'चा दावा भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा यांनी फेटाळून लावला. सिसोदिया यांच्या शिक्षण आणि अर्थ खात्याचा संदर्भ देत सिरसा यांनी सांगितले की, "त्यांनी शिक्षणावर काम केले असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी मद्यधोरणात भ्रष्टाचार करावा.

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी या अटकेवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. मनीष सिसोदिया यांना झालेली अटक ही हुकूमशाहीची पराकाष्ठा आहे. मोदीजी, एका चांगल्या व्यक्तीला आणि महान शिक्षणमंत्र्यांना अटक करून तुम्ही चांगले काम केले नाही. देवही तुम्हाला माफ करणार नाही. एक दिवस तुमची हुकूमशाही संपुष्टात येईल, संजय सिंह म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT