aap arvind kejriwal gives written prediction Gujrat Election say AAP party victory in gujrat elections 2022  
देश

Video : गुजरातमध्ये कोण जिंकेल? केजरीवालांनी भविष्यवाणी करत चक्क लिहूनच दिलं; म्हणाले…

सकाळ डिजिटल टीम

Gujrat Election 2022 : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच सर्व राजकीय पक्षांकडू जोरदार भाषणबाजीने सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आरोप-प्रत्यारोपांच्या व्यतिरिक्त या निवडणुकीत कोण बाजी मारेल याबद्दल वेगवेगळे अंदाजही बांधले जात आहेत. यातच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांनी एका कार्यक्रमामध्ये लिहून देत भविष्यवाणी केली आहे.

गुजरातमध्ये निवडणुकीचे मैदान कोण मारेल याची उत्सुकता लागलेली असताना आप सरकार स्थापन करेल असा ठाम विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. आम आदमी पक्षाच्या ट्विटर हँडलवरून या कार्यक्रमाची एक क्लिप शेअर करण्यात आली आहे, यामध्ये अरविंद केजरीवाल बोलताना दिसत आहेत.

या व्हिडीओच्या सुरूवातीला केजरीवाल त्यांनी यापूर्वी केलेली भविष्यवाणी ज्या खऱ्या ठरल्या त्यांची आठवण करून दिली आहे.

केजरीवाल म्हणाले की, "अनेक लोक म्हणतात की राजकारणात माझी भविष्यवाणी खरी ठरते. २०१४ मध्ये जेव्हा दिल्लीत निवडणुका झाल्या तेव्हा मी एका पत्रकाराला लिहून दिलं की काँग्रेसला शून्य जागा मिळतील. कुणीही विश्वास ठेवला नाही. पण त्या निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या. पंजाबच्या निवडणुकीत मी खूप सारी भाकितं केली होती. मी म्हटलं होतं नवज्योतसिंग सिद्धू हरतील. चन्नी दोन्ही जागांवरून हरतील. बादल यांचं पूर्ण कुटुंब हरणार"

केजरीवाल पुढे म्हणाले की, "आज मी लिहून देत भविष्यवाणी करतो की, .गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार बननणार, हे तुम्ही लिहून ठेवा. ही भविष्यवाणी देखील लिहून ठेवा. ही भविष्यवाणी खरी ठरेल. २७ वर्षांच्या कुशासनानंतर आता गुजरातच्या जनतेची यांच्या तावडीतून सुटका होईल", असेही केजरीवाल म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT