देश

Delhi : आपचे आमदार हाजी युनूस यांच्या गाडीवर हल्ला; मद्यधुंद तरुणांनी कुटुंबाला दिली धमकी

अचानक माझी गाडी त्यांनी थांबवली आणि गैरवर्तन करण्यास सुरुवात केली

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीच्या मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या आमदाराने गाडीवर हल्ला झाला असल्याचा आरोप केला आहे. आपच्या या आमदाराने त्यांच्या चारचाकीवर पाच लोकांनी हल्ला केला असल्याची माहिती दिली आहे. या गाडीतून ते त्यांच्या मुलगा आणि मुलीसह प्रवास करत होते. आपचे आमदार हाजी युनूस यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ट्विट करत दिल्ली पोलिसांकडे हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या व्हिडिओची दखल घेत दिल्ली पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. आमदार हाजी युनूस यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे. यात त्यांनी लिहलंय की, माझ्या गाडीवर काही समाजकंटकांनी हल्ला केला आहे. यावेळी माझी मुल त्या गाडीत होती. दारूच्या नशेत पाच तरुण पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये होते. त्यांनी अचानक माझी गाडी त्यांनी थांबवली आणि गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. दिल्ली पोलिसांनी यांची कृपया दखल घ्यावी.

आमदाराच्या ट्विटची दखल घेत दिल्ली पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसी कलम ३४१ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ ऑगस्ट रोजी घडली असून आमदाराचा मुलगा गाडीत उपस्थित होता. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या आरोपींच्या वाहन क्रमांकाच्या आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे.

आमदारांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये काही तरुण एका गाडीला घेरताना दिसत आहेत. गाडीत बसलेला तरुण त्याचा व्हिडिओ शुट करत ही गाडी आमदाराची असल्याचे सांगत आहे. या गाडीत एक आमदाराचे कुटुंब बसले आहे असे सांगितले. यानंतर त्या तरुणांनी गाडीच्या खिडकीजवळ येऊन गाडी नीट चालवण्यास सांगितले. कारमध्ये बसून व्हिडिओ बनवणारा तरुणाने त्यांच्या साथीदारांना 112 वर कॉल करण्यास सांगितले. यानंतर बराच वेळ वाद घातल्यानंतर आणि धमक्या दिल्यानंतर ते तरुण घटनास्थळावरून फरार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT