narendra modi and rahul gandhi 
देश

Karnataka Opinion Poll : भाजप 100चा आकडाही पार करणार नाही, तर काँग्रेसला 'एवढ्या' जागा

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली -कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला 11 दिवस उरले आहेत. मात्र निवडणुकीपूर्वी एबीपी न्यूज आणि सी व्होटरने ओपिनियन पोल प्रसिद्ध केला आहे. एबीपी न्यूज-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, यावेळी काँग्रेस पक्ष कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करू शकतो. ओपिनियन पोलने काँग्रेसला पूर्ण बहुमताचा अंदाज वर्तवला आहे, तर भाजप 100 जागांचा आकडाही पार करणार नाही, असं म्हटलं आहे.

एबीपी न्यूज-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार कर्नाटकात भाजपला 74 ते 86 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस पक्षाला 107 ते 119 जागा मिळू शकतात. तर जीडीएसला 23 ते 35 जागा मिळू शकतात. तर 0 ते 5 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. या ओपिनियन पोलवरून काँग्रेस पक्षाला बहुमत मिळू शकते हे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे, ओपिनियन पोलनुसार, कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक मतांची टक्केवारी मिळू शकते. ओपिनियन पोलनुसार काँग्रेस पक्षाला 40% मते मिळू शकतात. तर भाजपला 35 टक्के मते मिळू शकतात. जेडीएसला १७ टक्के तर इतरांना ८ टक्के मते मिळू शकतात.

ओपिनियन पोलनुसार जुन्या म्हैसूर भागात भाजपचा सफाया होऊ शकतो. पोलनुसार भाजपला ५५ पैकी फक्त ३ ते ७ जागा मिळू शकतात. तर काँग्रेस पक्षाला 21 ते 25 जागा मिळू शकतात. तर जीडीएसला 25 ते 29 जागा मिळू शकतात. तर 0 ते 1 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.

ओपिनियन पोलनुसार, कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांची पहिली पसंती आहे. ४१ टक्के लोकांना सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. तर 31% बसवराज बोम्मई, 22% एचडी कुमारस्वामी, 3% डीके शिवकुमार आणि 3% इतरांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT