Supreme-Court 
देश

अलीकडच्या काळात स्वातंत्र्याचा दुरुपयोग

पीटीआय

नवी दिल्ली - अलीकडच्या काळात भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वाधिक दुरुपयोग झाल्याची खंत सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केली. प्रसार माध्यमातून तबलिगी जमातची प्रतिमा खराब केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मत मांडले. तसेच केंद्राकडून ठोस शपथपत्र सादर न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरन्यायधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील न्यायधीश ए.एस.बोपन्ना, न्यायधीश व्ही. रामसुब्रह्यण्यम यांच्या पीठात जमैत उलमा ए हिंद आणि अन्य संघटनांनी याचिका दाखल केली आहे. कोविडच्या काळात माध्यमांनी तबलिगी जमातची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर आणल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला. देशात मुस्लिमांकडून कोरोनाचा फैलाव केला जात असल्याचे वातावरण माध्यमांनी तयार केले असून यावर न्यायालयाने बंदी घालावी, असे याचिकेत म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाचे म्हणणे
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, माध्यमांना तबलिगीच्या मुद्द्यावरून वार्तांकन करण्यापासून रोखू शकत नाही. यादरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शपथपत्र सादर करावे, असे आदेश दिले. अपप्रचार करणाऱ्या माध्यमांविरुद्ध काय कारवाई केली, याचा उल्लेख शपथपत्रात करावा, असे न्यायालयाने सांगितले. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT