Sakal
देश

Gautam Adani : गुंतवणूकदारांचे पैसै परत करण्यासाठी २० हजार कोटींचा FPO रद्द; अदानी समूहाचा मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः अदानी ग्रुपने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी २० हजार कोटींचा एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. बाजाराची अस्थिरता लक्षात घेता FPO रद्द करुन व्यवहार थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गुंतवणूकदारांचं नुकसान टळणार आहे.

अदानी एंटरप्रायझेसने स्टॉक एक्सचेंज फाईलिंगमध्ये म्हटले आहे की, गुंतवणूकदारांच्या हिताचा विचार करता कंपनीने एफपीओ अर्थात फॉलो ऑन पब्लिक ऑफर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा शेअर बुधवारी २८.५ टक्के घसरुन २,१२८.७० वर क्लोज झाला. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरुन ४९ टक्क्यांनी कोसळले. फक्त एका आठवड्यात स्टॉक ३७ टक्क्यांनी खाली आला आहे.

शेअर बाजारातील चढ-उताराचा फटका अदानी समूहाला बसला आहे. गौतम अदानी यांनी सांगितलं की, शेअर बाजारातील अस्थिरता आणि चढउतार यामुळे गुंतवणूकदारांचं हित बघणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही एफपीओमधून मिळवलेली रक्कम परत करणार आहोत. त्याच्याशी संबंधित देवाण-घेवाण थांबवण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

FPO म्हणजे काय?

फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणजे कोणत्याही कंपनीसाठी पैसे गोळा करण्याचं एक माध्यम आहे. जी कंपनी शेअर मार्केटमध्ये अगोदर लिस्टेड आहे ती कंपनी गुंतवणूकदारांसाठी शेअर ऑफर करते. हे शेअर बाजारात उपलब्ध असलेल्या शेअरपेक्षा वेगळे असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT