Gautam Adani 
देश

गौतम अदानींनी तिच्यासाठी केला मदतीचा हात पुढे; जाणून घ्या काय आहे 'लवली'ची व्यथा!

Gautam Adani help Lovely: गौतम अदानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कार्तिक पुजारी

लखनऊ- उत्तर प्रदेशातील लखीमपूरच्या एका लहान मुलीसाठी उद्योगपती गौतम अदानी यांनी मदतीचा हाथ पुढे केला आहे. लखीमपुर खैरीच्या कन्धरापूर गावामध्ये लवली नावाची लहान मुलगी राहते. तिच्या आईचे निधन झाले आहे. लहानपणापासून तिचा डावा पाय आणि हात वाकडे आहेत. त्यामुळे तिला चालण्यास अडचण येते. याची दखल गौतम अदानी यांच्याकडून घेण्यात आली आहे.

गौतम अदानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत की, 'लवलीला चांगले उपचार मिळावेत यासाठी अदानी फाऊंडेशन मदत करेल आणि लवली इतर मुलांसारखं चालू लागेल.' पत्रकार रवीश रंजन यांनी 'एक्स'वर यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर याची गौतम अदानी यांनी दखल घेतली.

लवली हात आणि पायाने दिव्यांग आहे. पत्रकार रंजन मुलीला विचारतात की, 'तू कोणत्या वर्गामध्ये शिकतेस? लवली सांगते की ती ५वीच्या वर्गात आहे. लवली असंही सांगते की तिला चालण्यास आणि फिरण्यास अडचण येते.' पत्रकार रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवली कन्धरापुर गावाची रहिवाशी आहे. आईच्या निधनानंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. लवलीचे जन्मापासून हात आणि पाय वाकडे आहेत. सध्या ती आपल्या वृद्ध आजी-आजोबांसोबत राहते.

पत्रकार रंजन यांनी लवलीला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला देशातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीने प्रतिसाद दिला आहे. अदानी यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, 'अशा प्रकारे एखाद्या मुलीचं लहानपण हिरावलं जाणं वाईट आहे. लहान वयामध्ये लवली आणि तिच्या आजी-आजोबांचा संघर्ष आपल्याला सांगतो की, भारतीय कधीही हार मानत नाहीत.'

अदानी फाऊंडेशन लवलीला मदत करणार आहे. इतर मुलांप्रमाणे तिला जगता यावं, शिक्षण घेता यावं यासाठी फाऊंडेशन मदत करणार आहे. आम्ही सर्व लवली सोबत आहोत, असं गौतम अदानी म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: ना तुला, ना मला... दीपक चहर अन् रॉबिन मिंझ यांची 'पाकड्यां'सारखी फिल्डींग; हार्दिक पांड्यावर तोंड लपवण्याची वेळ Video

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

SCROLL FOR NEXT