adar poonawal Esakal
देश

Omicron : कोविशील्ड किती प्रभावी हे 2-3 आठवड्यांत कळेल : अदर पुनावाला

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन अधिक गंभीर आहे की नाही हे आताच सांगता येणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोविशील्ड लस कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटविरूद्ध किती प्रभावी आहे, हे येत्या 2-3 आठवड्यांत कळेल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वरील विधान केले आहे.

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन अधिक गंभीर आहे की नाही हे आताच सांगता येणार नाही. मात्र, यासाठी बूस्टर डोसचा विचार केला जाऊ शकतो. परंतू, सध्या तरी प्रत्येकाला कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्याकडे सरकारचे लक्ष असले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

कोरोनाच्या डेल्टा प्रकारातही कोविशील्ड लस विषाणूचा सामना करण्यासाठी प्रभावी असल्याचे लॅन्सेट अभ्यासात आढळून आले आहे. ओमिक्रॉनवर कोविशील्डच्या परिणामाबद्दल अभ्यास सुरू असून याच्या परिणामकारकतेबाबत आणखी काही आठवडे वाट पहावी लागेल. दरम्यान, ऑक्सफर्डचे शास्त्रज्ञ संशोधन करत असून त्यांच्या निष्कर्षांवर आधारित एक नवीन लस आम्ही आणू शकतो, जी येत्या सहा महिन्यांत बूस्टर डोस म्हणून सादर केली जाऊ शकते.

दरम्यान, सरकारने जर बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला, तर आम्ही लसींचा योग्य तो पुरवठा करण्यास तयार आहोत. परंतु बूस्टर डोस देण्यापूर्वी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाला देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आमच्याकडे कोविड-19 विरुद्धची नवीन स्वदेशी लस कोवोव्हॅक्सचाही पुरेसा साठा उपलब्ध असून येत्या काही आठवड्यांत याच्या वापरासाठी मंजुरी मिळू शकते असेही ते म्हणाले. सध्या आम्ही दर महिन्याला 250 दशलक्ष लसीचे डोस तयार करत असल्याचे सांगत आगामी काळात भारतीय लस उद्योगाला कच्च्या मालासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार नसल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT