adar poonawalla sakal media
देश

सीरमकडून कोविशिल्डचं उत्पादन कमी होणार; पूनावालांचा महत्वाचा निर्णय

देशात कोरोनाच्या नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन संसर्गाने धुमाकूळ घातला आहे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (omicron) संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत २९ जणांना याची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यातच आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (serum institute of india) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला (adar poonawalla) यांनी कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड (covishield) लसीचे उत्पादन ५० टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

अदर पुनावाला बोलताना म्हणाले, केंद्र सरकार कडून ऑर्डर मिळाली नसल्याने पुढील आठवड्यापासून ५० टक्के लसीचे उत्पादन कमी केले जाणार आहे. मात्र, गरज पडली तर अधिकचा स्टॉक ठेवला जाणार आहे. तसेच, स्पुटनिक व्ही लसीचे २ ते ३ कोटी डोस साठवले जातील, जास्तीचा धोका पत्करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याची लस कोरोनोच्या नवा व्हेरिएंटवर प्रभावी ठरणार नाही, असे मानण्याचे कारण नाही. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनापासून संरक्षण होत असल्याचे भारतीय तज्ञांनी मानले आहे. योग्य डाटा मिळाल्याशिवाय अंदाज बांधला जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

लहान मुलांच्या लसीसाठी घाई नाही

फेब्रुवारी महिन्यापर्यंत लहान मुलांसाठीची लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामार्फत लाँच होण्याची शक्यता आहे. पण, याासाठी सुरू असलेल्या चाचण्यांत कसलीही घाई केली जाणार नाही. फेब्रुवारी २०२० पर्यंत लहान मुलांसाठी कोवोवॅक्स लाँच करण्यात येईल. आता तिचे परिक्षण सुरु असून, यासाठी फास्ट-ट्रॅक चाचण्या केल्या जाणार नाही. तशी आवश्यकता वाटत नसल्याचेही, अदर पूनावाला यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT