Adar Poonawalla esakal
देश

कोरोनाच्या बूस्टर डोसला उशीरा परवानगी, अदर पूनावाला यांनी व्यक्त केली खंत

'कोरोना लसीचा बूस्टर डोस आवश्यक आहे. त्यामुळे लोक सुरक्षित राहतील.'

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या काही राज्यांमध्ये पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता १८ वर्षांवरील सर्वांसाठी बूस्टर डोस घेण्याची परवानगी केंद्राने दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute Of India) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी देशातील कोरोना लसीकरण मोहिमेवर इंडिया इकाॅनाॅमिक काॅनक्लेव्हमध्ये आपल मत व्यक्त केले आहेत. पूनावाला म्हणाले, कोरोना (Corona) लसीचा बूस्टर डोस आवश्यक आहे. त्यामुळे लोक सुरक्षित राहतील. कोरोना आपले रुप बदलत आहे. तसेच त्याचे नवीन व्हेरिएंट्स येत आहेत. (Adar Poonawalla Say, Corona Booster Dose Get Late Permission)

केंद्र सरकारने कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी केल्याचे कौतुक करुन पुनावाला म्हणाले, आम्ही डिसेंबरपासून बूस्टर डोसला मंजूरी द्यावी या करिता विनंती करित होतो. मात्र त्यास उशीर झाला असून हे काम लवकर व्हायला हवे होते. सरकारवर टीका करित नाही. पण कोरोना महामारीच्या काळात नियामक संस्थांनी सक्रियता दाखवली, तसचं आताही करायला हवे, असा आशावाद अदर पूनावाला यांनी व्यक्त केला.

महामारीच्या काळात स्वदेशी कोरोना लसींनी चांगले काम केले. विकसित देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना लसीकरण मोहित उत्तम असल्याचे ते म्हणाले. इतरांप्रमाणे चार-पाच बूस्टर डोस घेण्याची आवश्यकता नाही. देशात बूस्टर डोस घ्यायला अगोदरच उशीर झाला असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EOL Vehicle: जुन्या वाहनधारकांना मोठा धक्का! १० वर्षांची डिझेल, १५ वर्षांची पेट्रोल कार होणार थेट जप्त; राज्य सरकारचा कडक निर्णय

IND vs PAK :'हस्तांदोलन' न करणे हा भारताने सुरू केलेला मुर्खपणा! Sanjay Manjrekar यांची वादग्रस्त पोस्ट; काहींचा सपोर्ट, तर काही विरोधात; तुमचं काय मत?

Education: अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षणात मूलभूत सुधारणेसाठी तरतूद करा; महायुती सरकारकडे शिफारस

अनैसर्गिक शरीर संबंध, व्हिडिओ बनवला अन्...; ९ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं १२ वर्षीय मुलासोबत नको ते कृत्य, घटनेनं संताप

Latest Marathi News Live Update : पालघरच्या एमआयडीसीत कंटेनर कंपनीला भीषण आग

SCROLL FOR NEXT