Vaccination campaign टिम ई सकाळ
देश

कौतुकास्पद! बर्फाळ प्रदेशातील खेड्यांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरण मोहीम

बर्फाने भरलेल्या रस्त्यांमधून मार्ग काढत आरोग्य कर्मचारी यांनी छोट्या खेड्यांमध्ये जाऊन लसीकरण केले

सकाळ डिजिटल टीम

देशभरात थंडीचा जोर कायम आहे. अशात देशातील बर्फाळ प्रदेशांमध्ये मोठया प्रमाणावर बर्फवृष्टीही होत असल्याचे चित्र आहे.मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या प्रदेशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे. इतक्या थंडीत आणि बर्फवृष्टीत आरोग्य कर्मचारी अगदी छोट्या छोट्या खेड्यांमध्ये जाऊनही लसीकरण करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून केल्या जात आहे.

अशा बर्फवृष्टीत जम्मू काश्मीरच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली बारामुल्ला येथील बोनियार येथे नियंत्रण रेषेजवळ असलेल्या अनेक गावांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. शनिवारला प्रचंड थंडीत, बर्फवृष्टीत, बर्फाने भरलेल्या रस्त्यांमधून मार्ग काढत आरोग्य कर्मचारी यांनी छोट्या छोट्या खेड्यांमध्ये जाऊन लसीकरण केले. खेड्यातील प्रत्येक घरी लसीकरण पोहचावे, हा उद्देश समोर ठेऊन लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

यावेळी भारतीय लष्कराने लसीकरण मोहीम राबविणाऱ्या आरोग्य पथकांना मदत पुरवत त्यांना सहकार्य केले. तसेच या लसीकरण मोहिमेत १५-१८ वयोगटातील मुले आणि बूस्टर डोससाठी पात्र असलेल्यांना सुद्धा लसमात्रा देण्यात आल्या असल्याची माहिती ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ परवेझ मसूदी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT