Congress Esakal
देश

Congress: काँग्रेसच्या 'लोकशाही वाचवा' कार्यक्रमादरम्यान दुर्घटना; अचानक कोसळलं स्टेज video Viral

या अपघातात काही नेत्यांना दुखापतही झाली आहे

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसच्या ‘सेव्ह डेमोक्रसी’ या कार्यक्रमाच्या दरम्यान स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे. छत्तीसगडमधील बिलासपूरमधून ही घटना समोर आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने नेते मंचायर उपस्थित होते. त्यामुळे या अपघातात काही नेत्यांना दुखापतही झाली. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

काँग्रेसची मशाल रॅली संपल्यानंतर काँग्रेस नेते जमलेल्यांना संबोधित करत असतानाच अचानक हा अपघात घडला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये अनेक काँग्रेस नेते स्टेजवर उभे असल्याचं दिसत आहे. यावेळी ते मोठमोठ्याने घोषणाही देताना दिसत आहेत. स्टेजवर भरपूर गर्दी झालेली आहे. इतक्यात नेत्यांनी भरलेला स्टेज अचानक कोसळला आणि नेते खाली पडल्याच पाहायला मिळालं.

काँग्रेसच्या 'लोकशाही वाचवा' या कार्यक्रमाच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. स्टेज कोसळल्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडालेली दिसुन आली. तिथे उपस्थित लोक ओरडू लागल्याचंही व्हिडिओमध्ये दिसुन येत आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या घटनेमध्ये काही नेते जखमी झाले आहेत.

देशभरात अनेक राज्यांमध्ये काँग्रेसकडून लोकशाही वाचवा मशाल रॅली काढण्यात येत आहे. बिलासपूरमध्येही ही रॅली काढण्यात आली होती. मात्र या रॅलीनंतर नेते लोकांना संबोधित करत असतानाच ही घटना घडली. व्हिडिओमध्ये दिसुन येत, की स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त लोक उभे आहेत. स्टेज कोसळताच ही सगळेजण खाली पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT