देश

हलगा सांडपाणी प्रकल्प विरोधात विष प्राशन करण्याचा इशारा

मिलिंद देसाई

बेळगाव -  गावाजवळ उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रकल्पाचे काम  कोणत्याही परिस्थितीत सुरू करू देणार नाही असा निर्धार करीत हलगा ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांनी प्रकल्प बंद न केल्यास विष प्राशन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे काही वेळ आंदोलनस्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

जिल्हाधिकारी डॉ. एस. व्ही. बोमनहल्ली यांनी हलगा ग्रामस्थांची भेट घेऊन प्रकल्पाचे काम बंद करता येणार नाही, मात्र भु संपादनाच्या बदल्यात वाढीव रक्कम आणि नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी आश्वासन धूडकावून लावीत आंदोलन सुरू ठेवले आहे.

जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या जमिनी घेणे चुकीचे असून बायपास आणि सुवर्ण विधान सौधसाठीही हलगा ग्रामस्थांच्या जमिनीचे भुसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा भु-संपादन करू नये, अशी मागणी केली. आंदोलनात शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शेतकऱ्यांनी गेट समोर बसून आंदोलन सुरूच ठेवले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT