Mumtaz Ahmed Patel
Mumtaz Ahmed Patel 
देश

Gujrat Riots: SITच्या दाव्यांवर भडकली अहमद पटेलांची मुलगी; म्हणाली, निवडणुका...

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : तिस्ता सेटलवाड यांना पैसा पुरवून गुजरात दंगलप्रकरणी मोदींना बदनाम करण्याचा आणि सत्तेतून खाली खेचण्याचा कट काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी रचल्याचा दावा गुजरात एसआयटीनं केला आहे. यावर पटेल यांची कन्या मुमताज पटेल यांनी एसआयटीचा दावा बनावट आणि बोगस असल्याचं म्हटलं आहे. गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुका डोक्यात घेऊन पटेल आणि काँग्रेसला बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. (Ahmed Patel daughter fumes over Gujrat SIT claims about Gujarat riots on Patel)

मुमताज पटेल म्हणाल्या, "ही पुन्हा एकदा गुजरात इलेक्शनची टिपिकल तयारी आहे. प्रत्येक वर्षी जेव्हा इथं निवडणुका असतात. नवा वाद निर्माण निर्माण केला जातो. काही वर्षांपूर्वी हे असलं काही का घडत नव्हतं? असा सवालही त्यांनी केला. मला नक्की खात्री आहे की, केंद्रातील मोदी सकारला हे सगळं माहिती असेलच मग त्यांनी गेल्या आठ वर्षांत पटेलांबाबतच्या या गोष्टी समोर का आणल्या नाहीत?"

तुम्हाला राजकारण करायला मोठ्या नावांची गरज असते. आम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे काही गोष्टी वदवून घेतल्या जातात आणि साक्षीदार तयार केले जातात. कोणीही काहीही बोलतो त्याची पडताळणी करायला कोण जातो? एकामागून एक ट्विट करत त्यांनी मोदी सरकारवर आपला राग व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की, कट कारस्थानाच्या राजकीय थेअरीमध्ये अहमद पटेल यांचं नाव घेऊन आत्ताच गुजरात निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालीए. त्यांनी अहमद पटेल जिवंत होते तेव्हापासून याला सुरुवात केली होती आता त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही ते सुरुच आहे.

दरम्यान, भाजपनंही गुजरात एसआयटीच्या या दाव्यानंतर काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. अहमद पटेल हे काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते. त्यामुळं सोनिया गांधींनीच आपल्या तिजोरीतून पटेल यांना मोदींविरोधात कट-कारस्थान करायला सांगितलं असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT