देश

Aids Humen Story : ‘लग्नानंतर दिड महिन्यातच मी आजारी पडले आणि...’; आता फुलवतेय अनेक एड्स पिडीतांच्या चेहऱ्यावर हास्य!

सकाळ डिजिटल टीम

आज जागतिक एड्स दिन आहे. 1988 पासून 1 डिसेंबर रोजी प्रत्येक वर्षी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. एड्स या रोगासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि एचआयव्ही विरुद्ध लढ्यात सहभागी होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत जिने या रोगाशी असामान्य लढा दिला आहे. जी या रोगातून बरी नाही होऊ शकत पण ती तिच्याचसारख्या अनेक लोकांचे जीनव संमृद्ध करण्यासाठी जगत आहे. तिची कहाणी तिच्याच शब्दात...

नमस्कार मी पी.कौशल्या उर्फ पेरियासामी कौशल्या. माझा जन्म 1975 च्या सुमारास झाला. मी दोन वर्षाची असतानाच माझ्या आईचे निधन झाले. त्यामूळे माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले. माझ्या सावत्र आईने माझा नीट सांभाळ केला नाही. तरीही वय वाढतच राहते आणि मी मोठी झाले. १९ व्या वर्षी माझे माझ्या चुलत भावाशी लग्न लावण्यात आले. मी या लग्नाला तयार नव्हते. पण, माझ्या आईची शेवटची इच्छा होती की, मी हे लग्न करावे, यासाठी मला त्याच्याशी लग्न करावे लागले.

वयाच्या एकोणिसाव्या वर्षी माझं लग्न झालं. लग्नानंतर पंचेचाळीस दिवसांनी मी आजारी पडले. मला डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी ज्या आजाराचे नाव सांगितले ते ऐकून मी भोवळ येऊन पडले. माझ्या पतीच्या संसर्गामुळे मी एचआयव्ही पॉझिटिव्ह झाले होते. माझ्या पतीने आणि त्यांच्या कुटुंबाने लग्नापूर्वी या आजाराबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. या फसवणुकीचाच मला या भयंकर रोगापेक्षाही अधिक धक्का बसला.

काही महिन्यांतच माझ्या पतीचा एड्सने मृत्यू झाला. मी वयाच्या विसाव्या वर्षीच विधवा झाले. यापेक्षाही वाईट तेव्हा वाटले जेव्हा माझ्या सासरच्या लोकांनी मला मालमत्तेच्या अधिकाराच्या भीतीने घराबाहेर काढले. मी तामिळनाडूतील नमक्कलचा येथे राहते.

एचआयव्ही सारखा गंभीर आजार होणे एकवेळ मी सहन करू शकले असते. पण, अशा परीस्थीतीत मी एकटी पडले. हे जास्त भयानक होते. मला जगण्याची इच्छाच उरली नव्हती. या सर्व नकारात्मक परीस्थितीत मार्ग काढण्याचे मी ठरवले. मला एचआयव्हीची लागण झाल्याचे सर्वांना सांगणे ‘ही’ त्या लढ्याची पहिली पायरी होती. नव्वदच्या दशकात भारतात हे काम स्त्रीसाठी इतके सोपे नव्हते.

त्या काळात या आजाराविषयी जागरुकता कमी होती. त्या बद्दल अनेक अफवा पसरत होत्या. माझ्या एचआयव्ही संसर्गाची ओळख सार्वजनिक करणारी मी त्यावेळी देशातील पहिली महिला होते. माझ्या या धाडसाने इतिहास रचला त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. माझ्या सासरच्या मालमत्तेमध्ये माझा हक्क मिळवण्यासाठी मी कायदेशीर लढाई लढली. माझ्या सासरच्या मंडळींना कोर्टात खेचले.

माझ्या एकटीच्या वाट्याला असे प्रसंग आले तर इतरांचे काय. हा विचार करून मी त्या लोकांसाठीही काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. माझे लक्ष्य एचआयव्ही बाधित व्यक्तींची विशेषत: महिलांची सामाजिक स्थिती सुधारण्याकडे वळले. खरं तर, त्याकाळात या संसर्गाबद्दल जागरूकता काहीच नव्हती. सरकारने एचआयव्हीशी संबंधित कार्यक्रमही सुरू केले होते. एचआयव्ही पॉझिटिव्ह लोक आणि त्यांना आवश्यक असलेल्या एआरव्ही थेरपीबद्दल फार कमी माहिती होती. महिलांच्या बाबतीत ही संख्या जवळपास शून्य होती.

या संसर्गापासून बचावाची माहिती प्रसारित केली जात होती. परंतु संसर्ग झालेल्या व्यक्तीवर उपचार आणि काळजी कुठेच दिसत नव्हती. जर कोणी एचआयव्ही पॉझिटिव्ह असेल तर त्यांना कुठे जावे, काय करावे हे कळत नव्हते. या समस्या लक्षात घेऊन मी एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांना मदत करू शकते, असे ठरवले.

यासाठी मला माझ्यासारख्या अनेक महिलांना मी भेटले. मी तज्ज्ञ आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला. या अथक परिश्रमानंतर मी 1998 मध्ये चार महिलांचा एक छोटा गट तयार केला. ज्याचे नाव ‘पॉझिटिव्ह वुमन नेटवर्क’ असे आहे. तेव्हापासून सुमारे वीस वर्षांच्या प्रवासात माझा ग्रुप दिवसेंदिवस विस्तारत गेला. योग्य माहितीच्या सहाय्याने कोणत्याही एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या आयुष्यात आनंद परत येऊ शकतो, हे मी अनुभवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

SCROLL FOR NEXT