देश

हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल भदोरिया यांची नियुक्ती

पीटीआय

नवी दिल्ली : हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून सरकारने आज एअर मार्शल राकेश कुमार सिंह (आरकेएस) भदोरिया यांची नियुक्ती जाहीर केली. सध्या ते हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. विद्यमान हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ येत्या 30 सप्टेंबरला निवृत्त होत असून, त्यांची जागा एअर मार्शल भदोरिया घेतील. 

एअर मार्शल भदोरिया हे पुण्याजवळच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) छात्र असून, 15 जून 1980 रोजी ते लढाऊ वैमानिक म्हणून दाखल झाले. 36 वर्षांच्या सेवेत विविध प्रकारच्या 26 विमानांच्या उड्डाणांचा 4,250 तासांचा अनुभव त्यांना असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने दिली.

परमविशिष्ट सेवा पदक (पीव्हीएसएम), अतिविशिष्ट सेवा पदक (एव्हीएसएम) आणि वायूसेना पदके त्यांना मिळाली आहेत. हवाई दलाच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून मार्च 2017 ते ऑगस्ट 2018 या काळात त्यांनी जबाबदारी सांभाळली. हवाई दलाच्या उपप्रमुखपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते ऑगस्ट 2018 पासून प्रशिक्षण विभागाचे प्रमुख होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT