Women Atrocitity
Women Atrocitity Sakal
देश

‘महिलां’च्यावरील अत्याचारांत चिंताजनक वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

देशात महिलांवरील अत्याचारांत पुन्हा वाढ झाली असून राष्ट्रीय महिला आयोगाकडे (एनसीडब्ल्यू) गेल्या वर्षभरात (२०२१) तब्बल ३१ हजार महिलांनी भावनिक व शारिरीक छळ होत असल्याच्या तक्रारी नोंदवल्या.

नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचारांत (Women Atrocities) पुन्हा वाढ झाली असून राष्ट्रीय महिला आयोगाकडे (एनसीडब्ल्यू) (NCW) गेल्या वर्षभरात (२०२१) तब्बल ३१ हजार महिलांनी भावनिक व शारिरीक छळ होत असल्याच्या तक्रारी (Complaint) नोंदवल्या. हे प्रमाण २०२० च्या तुलनेत सुमारे ३० टक्के अधिक आहे. सुमारे ५० टक्के महिला मतदार असलेल्या उत्तर प्रदेशातून यात सर्वाधिक म्हणजे १५,८२८ तक्रारी आल्या. महाराष्ट्र (Maharashtra) तिसऱ्या क्रमांकावर असून राज्यातील १५०४ महिलांनी आयोगाकडे दाद मागितली.

राष्ट्रीय महिला आयोग ही संसदेने नेमलेली स्वायत्त संस्था असून महिलांच्या छळाच्या किंवा कौटुंबिक कलहाच्या प्रकरणांत ही संस्था मध्यस्थी, समुपदेशन व गुन्हे नोंदविण्याचे काम करते. एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या मते, आयोगाने घरगुती छळ किंवा अन्य बाबींबद्दल तक्रारी नोंदवण्यासाठी महिला जागृतीची मोहीम राबविली. गुन्हे दाखल करण्याचे प्रमाणही वाढले. परिणामी अधिकाधिक महिला आपल्या छळाच्या तक्रारी देण्यास पुढे येत आहेत.

मात्र अजूनही हे प्रमाण कमीच आहे व राज्य व राष्ट्रीय महिला आयोगाकडील तक्रारींपेक्षा कितीतरी जास्त महिला दररोज घर किंवा कामकाजाच्या ठिकाणी घरगुती अत्याचार, लैंगिक छळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या छळाला सामोरे जातात व ते प्रकार सहनही करतात, असे आयोगाचे निरीक्षण आहे. २०१४ मध्ये मोदी सरकारने महिला आयोगाच्या कामकाजाचे स्वरूप बदलले. ऑनलाइन तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केली. तक्रारींची दखल घेण्याचे प्रमाण वाढविले. त्यावर्षी आयोगाकडे सुमारे ३४ हजार महिलांनी तक्रारी नोंदविल्या होत्या. २०१८ मध्ये मी-टू चळवळ सुरू होती, तेव्हाही तक्रारकर्त्या महिलांची संख्या ३० हजारांच्या आतच होती. त्यानंतर २०२१ मध्ये प्रथमच तक्रारकर्त्या महिलांची संख्या ३० हजारांच्या वर गेली आहे.

सन्मानापासून वंचित

२०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये ३० टक्के जास्त महिला तक्रारी नोंदविण्यास पुढे आल्या. यात हुंड्यासाठी छळ व घरगुती हिंसाचाराची प्रकरणे १० हजारांहून जास्त आहेत. सर्वाधिक म्हणजे तब्बल ११,०१३ महिलांनी भावनिक छळ होत असल्याच्या व सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी नोंदविल्या. हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याची तक्रार ४५८९ महिलांनी तर घरगुती हिंसाचाराच्या शिकार होणाऱ्या ६६३३ महिलांनीही आयोगाकडे दाद मागितली. २०२१ मध्ये जुलै ते सप्टेंबरपर्यंत दरमहा ३१०० तक्रारी आयोगाकडे आल्या. डिसेंबरमध्ये ३००० महिलांनी दाद मागितली. उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असल्याने तेथील तक्रारी सर्वाधिक असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. या राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महिला मतदारांचे प्रमाण तब्बल ५० टक्क्यांच्या आसपास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT