श्रीनगर: काश्‍मीर दौऱ्यावर असलेल्या विदेशातील दूतांच्या शिष्टमंडळाने बुधवारी हजरतबल दर्गा येथे भेट दिली.
श्रीनगर: काश्‍मीर दौऱ्यावर असलेल्या विदेशातील दूतांच्या शिष्टमंडळाने बुधवारी हजरतबल दर्गा येथे भेट दिली. 
देश

काश्‍मीरमध्ये राजदूतांचे शिष्टमंडळ दाखल

पीटीआय

श्रीनगर - भारतातील चोवीस राजदूतांचे शिष्टमंडळ आज दोन दिवसांच्या जम्मू कश्‍मीर दौऱ्यासाठी आज दाखल झाले. पहिल्या दिवशी श्रीनगरचे महापौर, जिल्हा विकास परिषद आणि गट विकास परिषदेच्या अध्यक्षांशी शिष्टमंडळाने चर्चा केली. या वेळी त्यांनी जम्मू काश्‍मीरमधील पंचायत राज पद्धत जाणून घेतली. जम्मू काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० वगळल्यानंतर काश्‍मीर दौऱ्यावर येणारे हे चौथे शिष्टमंडळ आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिष्टमंडळाचे नेतृत्व युरोपिय युनियनचे भारतातील राजदूत उगो एस्टुडो करत आहेत. या शिष्टमंडळात युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, आशियायी देशातील राजदूतांचा समावेश आहे. गृहमंत्रालयाच्या निमंत्रणावरून शिष्टमंडळ काश्‍मीर दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाला आज सकाळी बडगामच्या शासकीय महाविद्यालयात कडक बंदोबस्तात नेण्यात आले. तेथे स्थानिक प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर काश्‍मीर खोऱ्यातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीबाबत आणि रचनेबाबत माहिती देण्यात आली. या शिष्टमंडळात प्रामुख्याने युरोपिय युनियन, फ्रान्स, मलेशिया, ब्राझील, इटली, फिनलंड, बांगलादेश, क्यूबा, चिली, पोर्तुगाल, नेदरलँड, बेल्जियम, स्पेन, स्वीडन, सेनेगल, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान, आयर्लंड, घाना, इस्टोनिया, बोलिव्हिया, मालावी, इरिट्रिया आणि आयव्हरी कोस्ट यांचा समावेश आहे. यानंतर शिष्टमंडळ दल सरोवर आणि गुलमर्गला देखील जात आहे. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी हे शिष्टमंडळ जम्मूला पोचणार असून ते नायब राज्यपाल मनोज सिन्हांशी चर्चा करतील. 

कलम ३७० हटविल्यानंतर चौथे शिष्टमंडळ
५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द केल्यानंतर परदेशातील शिष्टमंडळाचा हा चौथा जम्मू काश्‍मीरचा दौरा आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१९, जानेवारी आणि फेब्रुवारी २०२० मध्ये देखील शिष्टमंडळाने जम्मू काश्‍मीरला भेट दिली. त्यानंतर कोरोना लॉकडाउनमुळे दौरे स्थगित करण्यात आले.

पाककडून काश्‍मीर मुद्दा
पाकिस्तानने मंगळवारी इस्लामाबाद येथे डिप्लोमॅटिक मिशन्सच्या प्रमुखांसमोर काश्‍मीरच्या स्थितीची माहिती दिली. परराष्ट्र सचिव सोहेल मेहमूद यांनी शिष्टमंडळाला माहिती दिली. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसार काश्‍मीर प्रश्‍नावर तोडगा करण्याचे आवाहन केले. 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT