file photo
file photo 
देश

अमेरिकी नागरिकाचा आदिम जमातीकडून खून

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अंदमान निकोबार बेट समूहांचा भाग असणाऱ्या उत्तर सेंटीनल बेटावर सेंटेनलिझ या आदिम जमातीच्या लोकांनी एका अमेरिकी नागरिकाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तत्पूर्वी अमेरिकी दुतावासाने या नागरिकास बेपत्ता घोषित केले होते. याप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे. जॉन ऍलन चाऊ (वय 27) या अमेरिकी पर्यटकास एका स्थानिक मच्छिमाराने या आदिम जमातींच्या प्रदेशात नेले होते, आता त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

पोर्टब्लेअरमधून प्रसिद्ध होणाऱ्या एका वर्तमानपत्रात या अमेरिकी पर्यटकाशी संबंधित थोडी माहिती प्रसिद्ध झाली असून, यामध्ये जॉन चाऊने तब्बल पाच वेळेस अंदमान आणि निकोबार बेटांना भेटी दिल्याचा उल्लेख आहे. काही दिवसांपूर्वी त्याने सेंटेनलिझ या वन्य जमातींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

सेंटेनलिझ ही सर्वांत हिंस्र अशी आदिम जमात म्हणून ओळखली जाते, मानवी सान्निध्यापासून नेहमीच अलिप्त राहणारे या जमातीचे लोक मनुष्य पाहताच त्याच्यावर बाणांनी हल्ला चढवितात. जॉन चाऊ 16 नोव्हेंबर रोजी स्थानिक मच्छिमारांची मदत घेत या बेटावर दाखल झाला होता. याआधी 14 नोव्हेंबर रोजीही त्याने तसाच प्रयत्न केला होता. येथील स्थानिक मच्छिमारांना चाऊ यांचा मृतदेह आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले.

बंदी मागे
उत्तर सेंटीनल या बेटावर पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. विशेष म्हणजे यंदाच सरकारने या बेटासह 28 अन्य केंद्रशासित प्रदेशांना प्रतिबंधित परिसराच्या यादीतून वगळले होते. 31 डिसेंबर 2022 पर्यंत हा निर्णय कायम राहील. ही बंदी उठविल्याने परकी पर्यटकांसाठी या बेटाची दारे खुली झाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT