America sakal media
देश

अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'हा' ऑनलाईन मेळावा

कृष्ण जोशी

मुंबई : अमेरिकेत (america) उच्च शिक्षणासाठी (higher education) किंवा नियमित बॅचलर डिग्री कोर्स (bachelor degree) शिकण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या (students) सोयीसाठी एज्युकेशन यूएसए (USA) अंतर्गत यूएस व्हर्चुअल फेअर 2021 आयोजित करण्यात आला आहे. या ऑनलाईन मेळाव्यात (online) सलग दोन शुक्रवारी अमेरिकी महाविद्यालयांमधील (American colleges) शिक्षणसंधींची (educational chance) माहिती मिळेल.

उद्या (27 ऑगस्ट) व पुढील शुक्रवारी (3 सप्टेंबर) असे दोन दिवस हा मेळावा होईल. ज्या विद्यार्थ्यांना मास्टर डिग्री किंवा पीएचडी करायची असेल त्यांच्यासाठी उद्या तर अन्य बॅचलर डिग्री अभ्यासक्रमांसाठी पुढील शुक्रवारी संधी आहे. या मेळाव्यात अमेरिकेतील वेगवेगळ्या शाखांमधील शंभरहून अधिक मान्यताप्राप्त विद्यापीठे आणि महाविद्यालये सहभागी झाली आहेत. त्यांचे अभ्यासक्रम, प्रवेशाचे निकष याची माहिती विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळेल. त्यांच्या शिक्षणतज्ञांशी तसेच सल्लागारांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याबाबत निर्णय घेता येईल. आपल्याला कोणत्या संधी उपलब्ध आहेत, तेथे शिष्यवृत्ती किंवा शिक्षणकर्ज-अर्थसाह्य कसे मिळेल, कोविडसंदर्भात काय काळजी घेतली जाते, काय काळजी घ्यावी लागते, याचीही माहिती मिळेल. अमेरिकी व्हिसा प्रक्रियेची माहितीही अमेरिकेच्या येथील महावाणिज्यदूत कार्यालयामार्फत मिळेल. या मेळाव्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क किंवा प्रवेश शुल्क नाही.

अमेरिकेत शिक्षणासाठी येऊन अमेरिकी उच्चशिक्षण व्यवस्थेत तसेच समाजव्यवस्थेत मोलाची भर घालणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे अमेरिका स्वागत करते. यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवरही आम्ही विक्रमी संख्येने स्टुडंट व्हिसा दिले आहेत. सध्या अमेरिकेत दोन लाख भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असून या मेळाव्याद्वारे त्यांच्याबरोबर शिक्षण घेण्याची मोठी संधी आहे, असे अमेरिकेचे मुंबईतील महावाणिज्य दूत डेव्हीड रँझ यांनी सांगितले.

27 ऑगस्ट - मास्टर डिग्री वा पीएचडी अभ्यासक्रमासाठी, लिंक - https://bit.ly/EdUSAFair21EmbWeb

3 सप्टेंबर - अन्य बॅचलर डिग्री अभ्यासक्रमांसाठी, लिंक - https://bit.ly/UGEdUSAFair21EmbWeb

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मंगळवारपासून २९ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस, काय आहे हवामान खात्याचा अंदाज

Latest Marathi News Updates : तुळजापुरात बनावट लिंक पाठवून पिता-पुत्रांची १६ लाखांची फसवणूक

Annual Toll Pass:'टोलच्‍या वार्षिक पासवर पसंतीची मोहर'; देशात आठच दिवसांत पाच लाखांहून अधिक जणांकडे सुविधा, शासनाला मिळाला १५० कोटींचा महसूल

Ghati Medical College: ‘घाटी’तील ३५७ पदांसाठी अकरा शहरांत आजपासून परीक्षा; ‘टीसीएस’तर्फे २७ केंद्रांवर तीन सत्रांमध्ये नियोजन

Accident News : भरधाव कंटेनरची भाविकांच्या ट्रॅक्टरला धडक, ८ जणांचा जागीच मत्यू, ४३ जखमी

SCROLL FOR NEXT