amit shah announced 2500 crore scheme for 7 cities including mumbai and pune to reduce flood risk  esakal
देश

मुंबई, पुण्यासह सात शहरांत पुराचा धोका टाळण्यासाठी २५०० कोटींची योजना! अमित शाहांनी केली घोषणा

रोहित कणसे

मुंबई पुण्यासह देशातील सात शहरांसाठी केंद्र सरकारने आपत्ती निवारण योजना जाहिर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी ही घोषणा केली आहे. मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या सात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा या योजनेमध्ये सहभाग असणार आहे. दिल्लीत विज्ञान भवन येथे आपत्ती व्यवस्थापनाची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत या घोषणा करण्यात आल्या.

 या शहरांसाठी केंद्र सरकारने २५०० कोटी रूपयांचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी ही घोषणा केली आहे. या सात शहरात पुराचा धोका टाळण्यासाठी तसेच १७ राज्यांमधील भुस्खलन रोखण्यासाठी ८ हजार कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या तीन योजना जाहिर करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यात अग्निशमन सेवेच्या विस्तारासाठी आणि अधुनिकीकरणासाठी ५ हजार कोटींची मदत देण्यात येईल, असेही अमित शाह यांनी सांगितले.

अमित शाह यांनी 350 अति जोखीम आपत्ती प्रवण जिल्ह्यांमध्ये सुमारे एक लाख युवा आपदा मित्र (स्वयंसेवक) तयार करण्याचे लक्ष्य निश्चित केल्याची माहिती देखील यावेळी दिली. या निर्णयामुळे आपत्ती उद्भवल्यास त्यातून जलदरित्या बाहेर निघता येईल. राज्यात या पद्धतीचे प्रशिक्ष‍ित आपदा मित्र आठ हजारांच्या वर आहेत. महाराष्ट्र राज्य असे पहिले राज्य आहे ज्यांनी प्रशिक्षित आपदा मित्र अशी संकल्पना राबवून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: 24 विभागांत विभागलेली मुंबई; एकूण वॉर्ड किती? कारभार सोपा की गुंतागुंतीचा? पाहा मुंबई महापालिका निवडणुकीचं संपूर्ण गणित

पाकड्याची लाज गेली! BBL पदार्पणात Shaheen Afridi ला गोलंदाजी करण्यापासून रोखले; अम्पायरने कान टोचले, नेमके काय घडले? Video

Municipal Corporation Election 2025 : अखेर मनपा निवडणुका जाहीर, मतदान अन् निकालाची तारीख काय? कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा....

Latest Marathi News Live Update : मेस्सीच्या दिल्ली दौऱ्याला धुक्याचा फटका; इतर कार्यक्रम रद्द करून थेट स्टेडियममध्ये होणार कार्यक्रम

BMC Election: सत्ता, संघर्ष आणि संधी... बीएमसीच्या गेल्या ५ निवडणुकांचे निकाल काय होते? जाणून घ्या मुंबई महापालिकेचा राजकीय प्रवास...

SCROLL FOR NEXT