बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

DIVYA SHINDE EVICTED AFTER DEATH THREAT ON NATIONAL TV: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून स्पर्धक दिव्या शिंदे हिला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. एका टास्कदरम्यान तिने सहस्पर्धकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
DIVYA SHINDE EVICTED AFTER DEATH THREAT ON NATIONAL TV

DIVYA SHINDE EVICTED AFTER DEATH THREAT ON NATIONAL TV

esakal

Updated on

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या ६ व्या सीझनमध्ये एक धक्कादायक घटना घडली. घरातील स्पर्धक दिव्या शिंदे हिला बिग बॉसनं घराबाहेर काढलं आहे. दिव्याने नॅशनल टेलिव्हिजनवर इतर स्पर्धकाला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे बिग बॉसने तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तिला दंड म्हणून बिग बॉसने घराबाहेर काढलं. परंतु दिव्या तिच्या म्हणण्यावर शेवटपर्यंत ठाम होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com