Amit Shah's Retirement Statement: What He Actually Said: देशभरातील सर्वसामान्यांना आकर्षण असलेल्या व्यक्तींमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही नाव आपल्याला दिसते. त्यांनी घेतलेल्या निर्णयांबाबत, कोणत्याही राज्यातील राजकीय कोंडी फोडण्यात त्यांची दिसलेली महत्त्वाची भूमिका किंवा त्यांची आक्रमक भाषणं ही कायमच चर्चेचा विषय असतात. परंतु आता अमित शाह यांच्याबाबत आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी सध्या चर्चेत आली आहे. ती म्हणजे, अमित शाह यांनी आपला रिटारमेंट प्लॅन सांगितला आहे. यानंतर आता अमित शहा राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहेत का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल मोठे विधान केले आहे. अमित शहा म्हणाले की त्यानी राजकारणातून निवृत्ती घेतल्या नंतरची योजना आधीच आखली आहे. ते म्हणाले की जेव्हा केव्हा ते निवृत्त होतील तेव्हा ते वेद आणि उपनिषदांचे वाचन करून त्यांचे आयुष्य घालवतील आणि त्याशिवाय त्यांनी नैसर्गिक शेती करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.
अमित शहा म्हणाले की मला शेती आवडते, मी निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करेन. त्यांनी असेही म्हटले की त्यांना वेद, उपनिषदांचा अभ्यास करायला आवडते, जे ते सध्या करू शकत नाहीत. म्हणून मी निवृत्तीनंतर माझा वेळ यात घालवीन, असं त्यांनी सांगतिले आहे.
अमित शहा म्हणाले आहेत की, "मी निवृत्तीनंतर माझे उर्वरित आयुष्य वेद, उपनिषद आणि नैसर्गिक शेतीसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. रासायनिक खतांनी पिकवलेला गहू अनेकदा अनेक आरोग्य समस्या निर्माण करतो. तर नैसर्गिक शेती शरीराला रोगमुक्त करण्यास मदत करतेच, परंतु कृषी उत्पादकता देखील वाढवते."
याशिवाय अमित शहा यांनी त्यांच्या मंत्री पदाच्या प्रवासाबद्दलही भाष्य केले आणि सहकार मंत्रालय त्यांच्यासाठी किती खास आहे हे सांगितले. अमित शहा म्हणाले, "जेव्हा मी देशाचा गृहमंत्री झालो तेव्हा सर्वांनी मला सांगितले की मला एक अतिशय महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे, परंतु ज्या दिवशी मला सहकार मंत्री बनवण्यात आले, तेव्हा मला असे वाटले की मला गृहमंत्रालयापेक्षाही मोठे खाते मिळाले आहे, जे देशातील शेतकरी, गरीब, गावे आणि पशूंसाठी काम करते."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.