Ashish Mishra News Updates टिम ई सकाळ
देश

आशिष मिश्राचा जामीन रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

आशिष मिश्रा यांचा जामीन रद्द करण्यासाठी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

लखीमपूर खेरी प्रकरणातील मुख्य आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याची मंगळवारी जामीनावर सुटका झाली होती. त्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून आशिषला सोडण्यात आले होते मात्र आता आशिष मिश्रा यांचा जामीन रद्द करण्यासाठी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)याचिका दाखल केली आहे.

तीन ऑक्टोबर रोजी झालेल्या टिकुनिया घटनेत चार शेतकरी, एक पत्रकार, एक चालक आणि दोन भाजप कार्यकर्ते ठार झाले होते. एका पत्रकाराच्या मृत्यूप्रकरणी एसआयटीने आशिष मिश्रा उर्फ ​​मोनूसह १४ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यात चार शेतकऱ्यांचा समावेश होता. याप्रकरणी आशिष मिश्रा हा १० ऑक्टोबरपासून जिल्हा कारागृहात होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयातून त्यांची सुटका करण्याचे आदेश मंगळवारी सकाळी कारागृहात पोहोचले. त्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून आशिषला सोडण्यात आले. आशिष १२८ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak: 'तो' पेपर फुटलाच नव्हता? तक्रारच बनावट? तक्रारदाराने 'ई-मेल'मध्ये काय म्हटलंय?

Manoj Jarange: मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा सुरू होणार? २९ जुलैला मनोज जरांगे काय घोषणा करणार? आंदोलनाच्या पुढील दिशेवर निर्णय लवकरच

Latest Marathi News Live Update: दिल्लीचे कडकडडूमा न्यायालय ३१ जुलै रोजी ताहिर हुसेन आणि इतर दोषींना शिक्षा सुनावणार

Heritage Alert: टाकळी राजेरायची ऐतिहासिक वेशी ढासळली; प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर

Pandharpur Ashadhi Wari AI count : आषाढी वारीत पंढरपुरात विक्रमी 32 लाख भाविक; एआय तंत्रज्ञानातून अचूक मोजणी, दुबार नोंदणीला आळा

SCROLL FOR NEXT