andaman and nicobar earthquake 
देश

अंदमान-निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के, 5.0 रिश्टर स्केलची तीव्रता

भूकंपाचा केंद्रबिंदू हा अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरपासून 215 किमी अंतरावर आहे.

सकाळ डिजिटल टीम

भूकंपाचा केंद्रबिंदू हा अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरपासून 215 किमी अंतरावर आहे.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या अंदमान आणि निकोबारला आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी पावणेसहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे पर्यटक चिंतेत आहेत. भूकंपाची तीव्रता ५.० रिश्टर स्केल इतकी होती. (andaman and nicobar earthquake)

सोमवार अंदमान आणि निकोबारवरील वातावरण थंड आणि पावसाचे होते. मात्र आज पहाटे पावणे सहाच्या सुमारास जमीनीला हादरे बसू लागले. हे धक्के इतके जोरदार होते की परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर पडले. दरम्यान, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, अंदमान-निकोबार येथे झालेल्या या भुंकपाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षा बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू हा अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरपासून 215 किमी अंतरावर आहे. भूकंपाचे धक्के जोरदार होते परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची जिवीत किंना वित्त हानी झाल्याची नोंद झालेली नाही. याआधीही 4 जुलै रोजी अंदमान-निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. ते हादरेही तीव्र असल्याचे सांगण्यात आले आहे.

४ जुलै रोजी झालेल्या भुकंपाची ४.४ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू पोर्ट ब्लेअरपासून २५६ किमी आग्नेयेला होता. त्या भुंकपातही बेटावर कोणत्याही प्रकारची हानी झाली असल्याची नोंद नाही. अंदमान आणि निकोबार बेट भूकंपाच्या दृष्टीने असुरक्षित श्रेणीत येते. त्यामुळे नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT