jobs
jobs 
देश

खूशखबर! 'या' राज्यात स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण

वृत्तसंस्था

विजयवाडा : खासगी क्षेत्रातील सर्व प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना 75 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

स्थानिकांना खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण लागू केले आहे. ज्या खासगी कंपन्या किंवा कारखान्यांना सरकारकडून कुठलीही आर्थिक किंवा इतर मदत दिली जात नाही अशा कंपन्यांमध्येही हे आरक्षण लागू असणार आहे. आंध्र प्रदेशच्या विधानसभेत सोमवारी ‘आंध्र प्रदेश एम्प्लॉयमेंट ऑफ लोकल कॅन्डिडेट इन इंडस्ट्रिज, अॅक्ट 2019’ हे विधेयक मंजुर करण्यात आले. या कायद्यानुसार, आता खासगी क्षेत्रातील सर्व प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये स्थानिक नागरिकांना 75 टक्के आरक्षण लागू असणार आहे. 

या आरक्षणामध्ये औद्योगिक संस्था, कारखाने, संयुक्त उपक्रम त्याचबरोबर पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये उभारण्यात आलेले प्रकल्प यांमधील नोकऱ्यांचा समावेश असेल. देशात रोजगाराचा प्रश्न गंभीर होत असताना अनेक राज्यांकडून खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना आरक्षण सुरु करण्याची मागणी अनेक काळापासून होत आहे. यापूर्वी मध्य प्रदेश सरकारने 9 जुलैला स्थानिकांसाठी राज्यात 70 टक्के आरक्षणासाठी कायदा करण्यात येणार असल्याची केवळ घोषणा केली होती. यासाठी खासगी कंपन्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत आणि सुविधाही पुरवण्यात येतील असे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटले होते. महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करत आहेत. 

आंध्र प्रदेश सरकारच्या या नव्या कायद्यात म्हटले आहे की, जर स्थानिकांमध्ये आवश्यक कौशल्य नसेल तर कंपन्यांनी त्यांना संबंधित कामासंबंधीचे प्रशिक्षण सरकारच्या सहकार्याने द्यावे आणि त्यानंतर त्यांना नोकरी द्यावी. कायद्यातील या तरतुदीमुळे या कंपन्यांना नोकऱ्या नाकारताना संबंधित व्यक्तीमध्ये कौशल्य नसल्याचे कारण देता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT