Andhra startup W3Layouts accuses BJP of using its web template without credit
Andhra startup W3Layouts accuses BJP of using its web template without credit 
देश

'चौकीदारांच्या पक्षानेच चोरले आमच्या वेबसाईटचे डिझाईन'

वृत्तसंस्था

हैद्राबादः भारतीय जनता पक्षाची वेबसाइट हॅक झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर पुन्हा सुरू झाली. मात्र, या नवीन वेबसाइटच्या डिझाइनवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजपने कोणतीही पुर्वपरवानगी न घेता आमचे डिझाइन चोरले आहे. चौकीदारांचा पक्ष डिझाइन पण चोरतो, असा आरोप एका कंपनीने ब्लॉगवरून केला आहे.

भाजपच्या या नव्या अधिकृत वेबसाईटसाठी वापरण्यात आलेले वेब टॅम्पलेट आपल्या मालकीचे असून कोणतीही पूर्वपरवणगी न घेता ते वापरण्यात आले आहे, असा दावा आंध्र प्रदेशमधील डब्यू थ्री लेआऊट्स या कंपनीने कंपनीने केला आहे. वेब डिझाइन क्षेत्रात डब्यू थ्री लेआऊट्स ही कंपनी काम करत असून, भाजपने आमची कोणतीही परवाणगी न घेता वेबसाईटसाठी आमचे टेम्पलेट वापरल्याचे या कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. चोरी उघड होऊ नये म्हणून टेम्पलेटची बॅक लिंक हटवल्याचा आरोपही या कंपनीने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

'जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणारा भारतातील सत्ताधारी पक्ष सौजन्य न देता आमचे टॅम्पलेट कसे चोरू शकतो?', या शिर्षकाखाली कंपनीने ब्लॉग प्रकाशित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'आंध्र प्रदेशमधील नेर्रोल येथील एक लहान स्टार्टअप कंपनी आहे. आम्ही प्रिमियम दर्जाचे एटचीएमएल वेब टॅम्पलेट तयार करुन ते नवीन वेबसाईट करणाऱ्यांना उपलब्ध करुन देतो. भाजपची वेबसाईट गेल्या काही दिवसांपासून बंद होती. ती पुन्हा सुरु झाली. त्यातही त्यांनी आमचे टेम्पलेट वापरल्याने आम्हाला खूपच आनंद झाला. आमच्या वेबसाईटवरील टेम्पलेट कोणीही वापरू शकतो. मात्र, ते वापरल्यानंतर वेबसाईटच्या शेवटी एक बॅक लिंक असते ज्यावरुन हे टॅम्पलेट कोणी तयार केले आहे हे समजते. भाजपने आपल्या साईटवरून ही बॅक लिंकच काढून टाकली आहे. भाजपच्या आयटी सेलला आमचे काम आवडले आणि त्यांनी आमचे टेम्पलेट वापरल्यामुळे आम्ही खूप खूष होतो. मात्र, त्यांनी बॅकलिंक काढून टाकत या कामाचे श्रेय आम्हाला दिले नाही, हे समजल्यानंतर आम्हाला धक्काच बसला. या टेम्पलेटसाठी भाजपने आम्हाला पैसेही दिले नाहीत आणि श्रेयही दिले नाही. भाजपला ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही.'

डब्यू थ्री लेआऊट्सने ब्लॉगच्या शेवटी म्हटले आहे की, 'भाजपच्या आयटी सेलने वेबसाईटचे संपूर्ण कोडींग आता बदलले आहे. राष्ट्रीय पक्षाचा प्रमुख नेता स्वत:ला चौकीदार म्हणवतो तो पक्ष अशाप्रकारे दुसऱ्याचे काम कोणतेही सौजन्य न देता कसे चोरु शकतो, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. एका छोट्या कंपनीचे कामाची चोरी केल्यानंतर पकडले गेल्यावरही चोरी मान्य करण्याचे सौजन्यही पक्षाने दाखवले नाही,' दरम्यान, जागतिक सुरक्षातज्ज्ञ इलियट अल्डरसन यांनीही याबाबत ट्विटरवरुन भाजपला लाज वाटली पाहिजे असे ट्विट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT