mumbai crime update couple killed man two call girl arrested police  sakal
देश

Beheaded Chennai Man: लहान भावाकडून बहिणीची हत्या, प्रियकराचं शीर धडावेगळं! आईवरही केले वार; भीषण हत्याकांडानं चेन्नई हादरलं

या भीषण हत्याकांडामागं नेमकं काय कारण होतं? जाणून घेऊयात

Amit Ujagare (अमित उजागरे)

चेन्नई : तामिळनाडूमध्ये एका तरुणानं आपल्या बहिणीची हत्या केली, तिच्या प्रियकराचा शिरच्छेद केला आणि आईनं हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचं मनगट कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मदुराईतील तिरुमंगलमजवळ मंगळवारी रात्री ही भीषण घटना घडली. (angry over sister relationship man beheads her lover kills her chops off mother wrist)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीणकुमारची (22 वर्षे) बहीण ए महालक्ष्मी (वय २५) ही 28 वर्षीय एन सतीशकुमारसोबत रिलेशनशिपमध्ये होती. महालक्ष्मीने चार वर्षांपूर्वी वलयंकुलममधील एका व्यक्तीशी लग्न केलं पण लवकरच त्यांचा घटस्फोट झाला होता. ती सध्या कोंबडी इथं आई-वडिलांसोबत राहत होती, याच ठिकाणी नंतर तिचं आणि सतीशकुमारचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं. (Latest Marathi News)

तिचा धाकटा भाऊ प्रवीणकुमार याला त्याचं रिलेशनशिप मान्य नव्हतं. बहिण महालक्ष्मीनं सतीशकुमारशी संपर्क साधू नये अशी तंबी त्यानं दिली होती. मात्र, महालक्ष्मीनं हे प्रकरण सुरूच ठेवलं आणि मंगळवारी रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास प्रवीणकुमारनं सतीशकुमारला कामावरुन घरी परतत असताना बेदम मारहाण केली. (Marathi Tajya Batmya)

पोलिसांनी सांगितले की, आरोपीनं सतीशकुमारवर हल्ला केला, त्याचा शिरच्छेद केला आणि त्याचे शीर जवळच्या थिएटर स्टेज इमारतीत ठेवलं. त्यानंतर, त्यानं घरी जाऊन आपल्या बहिणीचा गळा धारदार शस्त्रानं चिरला. यावेळी त्याची आई ए सेल्वी यांनी यामध्ये हस्तक्षेप केला तेव्हा त्यानं तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर वार केले आणि तिचा पंजा मनगटापासून छाटला, असंही यात म्हटलं आहे.

या हल्ल्यात महालक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर प्रवीणकुमार घटनास्थळावरून पळून गेला. सतीशकुमारच्या भावानं कुडाकोविल पोलिसात हत्येची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी प्रवीणकुमारला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: भारताने शेवटच्या क्षणी पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला तर काय होईल? सुपर-४ मध्ये प्रवेश मिळेल का?

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

SCROLL FOR NEXT