Apple Alert Hacking eSakal
देश

Apple Alert : अ‍ॅपलच्या अल्गोरिदममधील खराबीमुळे येतायत इशारे, 'इंडिया'च्या आरोपांवर सरकारी सूत्रांचे स्पष्टीकरण - रिपोर्ट

INDIA : इंडिया आघाडीतील कित्येक नेत्यांनी केंद्र सरकार आपला आयफोन हॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप आज केला होता.

Sudesh

इंडिया आघाडीतील कित्येक नेत्यांनी केंद्र सरकार आपला आयफोन हॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप आज केला होता. महुआ मोईत्रा, प्रियांका चतुर्वेदी, शशी थरूर अशा मोठ्या नेत्यांनी याबाबत अ‍ॅपल कंपनीने आपल्याला इशारा दिल्याचं म्हटलं होतं. मात्र, अ‍ॅपलच्या अल्गोरिदममधील खराबीमुळे हे इशारे मिळत असल्याचं स्पष्टीकरण सरकारी सूत्रांनी दिलं आहे.

इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. याबाबत लवकरच सरकार आपलं अधिकृत स्टेटमेंट जाहीर करेल, असंही या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. 'स्टेट-स्पॉन्सर्ड अटॅकर्स' तुमच्या मोबाईलला टार्गेट करत आहेत, असा इशारा आज 'इंडिया' आघाडीतील कित्येक नेत्यांना अ‍ॅपल कंपनीकडून मिळाला होता.

यावर प्रतिक्रिया देत शिवसेनेच्या (ठाकरे गट) प्रियांका चतुर्वेदी यांनी हे अगदी हास्यास्पद कारण असल्याचं म्हटलं आहे. केवळ विरोधी पक्षातील नेत्यांनाच अशा प्रकारचे इशारे मिळाले आहेत. अगदी मालवेअर देखील ठराविक लोकांनाच इशारे देत आहे हे विनोदी आहे; असं त्या म्हणाल्या आहेत.

राहुल गांधींचाही मोठा आरोप

काँग्रेस नेते राहुल गांधींनी देखील केंद्र सरकारवर हेरगिरीचा आरोप केला आहे. माझ्या कार्यालयातील प्रत्येकाला अ‍ॅपलकडून आलेला अलर्ट मिळाला आहे. के.सी. वेणुगोपाल, पवन खेडा, प्रियांका चतुर्वेदी, राघव चड्ढा, टीएस सिंहदेव, महुआ मोईत्रा अशा सर्वांना हे इशारे मिळाले आहेत.

अदानींवर टिका करताच गुप्तचर संस्था, सीबीआय तपास चालू करतात. सध्या देशात नंबर 1 वर अदानी, नंबर 2 वर पंतप्रधान आणि नंबर 3 वर अमित शहा आहेत; असंही राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

Pali Flyover Construction Update : 34 ते 35 खांब आणि नवा आराखडा! मुंबई-गोवा हायवेवरील पाली उड्डाणपूल कधी सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

SCROLL FOR NEXT