JEE File Photo
देश

कोरोनाचा प्रादुर्भाव; एप्रिलमध्ये होणारी जेईई परिक्षा स्थगित

राष्ट्रीय परीक्षा एजेन्सीद्वारा (एनटीए) एप्रिलअखेर घेण्यात येणारी जेईई (जॉइंट एंट्रन्स एक्‍झाम) परिक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

April session for JEE (Main) 2021 has been postponed : देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. अनेक राज्यातील विद्यार्थांना पुढील वर्गात प्रमोट करण्यात आलं आहे. तर काही परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यातच भर म्हणून राष्ट्रीय परीक्षा एजेन्सीद्वारा (एनटीए) एप्रिलअखेर घेण्यात येणारी जेईई (जॉइंट एंट्रन्स एक्‍झाम) परिक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. एनटीएने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सुचना जारी केली आहे. त्याशिवाय केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी सकाळी ट्वीट करून एप्रिल महिन्यातील परीक्षा पुढे ढकलली असल्याचे स्पष्ट केले. परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची नवी तारीख किमान १५ दिवस आदी जाहीर केली जाणार असल्याचे 'एनटीएन'ने निवेदनात नमूद केलेले आहे. फेब्रुवारी महिन्यात सहा लाख वीस हजार विद्यार्थ्यांनी तर मार्च महिन्यात पाच लाख 56 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे.

यंदा जेईईची मेन परीक्षा चार सत्रांत घेण्यात येत आहे. पहिले सत्र 23, 24, 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. त्याचा निकाल 7 मार्च रोजी लागला. त्याच वेळी, एनटीए सत्र 16, 17 आणि 18 मार्च रोजी आयोजित केली होती. आता 27, 28 आणि 30 एप्रिल रोजी होणारी जेईई परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परिक्षा होण्याच्या 15 दिवस आधी नवीन वेळापत्रक जारी करण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

देशभरात कोरोनाच्या साथीने हाहाकार माजविला असून रोज लाखो रुग्णांची नव्याने भर पडत आहे. यामुळे विविध परीक्षांवर याचा परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच सीबीएससी बारावीची परीक्षा पुढे ढकलली तर दहावीची परीक्षा रद्द केली आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय पदव्युत्तर पदवीची नीट परीक्षाही पुढे ढकलली आहे. महाराष्ट्रात इयत्ता दहावी बारावी, एमपीएससी या परीक्षांवर परिणाम झालेला आहे, या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र, जेईई मेन्स एप्रिल याबाबत कोणताही निर्णय झालेला नव्हता विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देखील वितरित करण्याचे काम सुरू झाले होते. मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Coastal Flood Risk : कोकण किनारपट्टीला मोठा धोका! यंदा पावसाळ्यात 23 दिवस समुद्राला 'उधाण'; 4.5 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार, 145 गावांना सतर्कतेचा इशारा

Pune News: म्हाळुंगे परिसरात सकाळी दोन तासांचा वाहन कोंडीचा ट्राफिक अडथळा; राधा चौक ते शितळादेवीनगर, वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live : आंबेनळी घाटात भीषण अपघात, ९०० फूट खोल दरीत पडून नवरा-बायकोचा मृत्यू

Solapur NCP Politics: साेलापूरमध्ये राष्ट्रवादीत ‘चलती’ कोणाची? अभिजित पाटील की संजयमामा, मेमध्ये मोठ्या घडामोडींचे संकेत!

लग्नसमारंभात मोठी दुर्घटना! बांधकामाचा स्लॅब कोसळून वऱ्हाडी खड्ड्यात पडले; अनेकजण जखमी, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT