Gyanvapi Masjid Survey esakal
देश

Gyanvapi ASI Survey : ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण सुरू; १७व्या शतकातील मंदिराचा शोध घेतला जाणार

अंजुमन इंतेजामिया मशीद समितीने या कामावर बहिष्कार घातला, शुक्रवारची नमाज लक्षात घेता सर्वेक्षणाचे काम दोन तासांसाठी थांबविण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

वाराणसी : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाने येथील ज्ञानवापी मशिदीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणास आजपासून सुरुवात केली. मूळ मंदिराची वास्तू पाडून मशिदीची उभारणी केली आहे का, हे निश्चित करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने सर्वेक्षणाचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ३) दिले होते.

या आदेशानुसार, आज सकाळी सात वाजता पुरातत्त्व विभागाने सर्वेक्षणाच्या कामाला सुरूवात केली. अंजुमन इंतेजामिया मशीद समितीने या कामावर बहिष्कार घातला. दरम्यान, शुक्रवारची नमाज लक्षात घेता सर्वेक्षणाचे काम दुपारी बारा ते दोन या वेळेत दोन तासांसाठी थांबविण्यात आले होते.

यावेळी पुरातत्त्व विभागाच्या पथकाबरोबर हिंदू धर्मीयांचे वकील सुभाष चतुर्वेदी तसेच या प्रकरणातील हिंदू याचिकाकर्तेही यावेळी उपस्थित होते. दरम्यान, ज्ञानवापी मशिदीच्या आवारात कोणताही अनुचित प्रकार न होता कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अंजुमन इंतेजामिया मशीद समितीचे सचिव सईद मोहम्मद यासीन म्हणाले, की आम्ही अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे, मुस्लिम गटाच्या वकीलांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला नाही.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत हे सर्वेक्षण पुढे ढकलावे, अशी आमची मागणी होती. यासंदर्भात, आमच्या वकिलांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्रही पाठविले होते. मात्र, त्याला उत्तर आले नाही. त्यामुळे, समितीने बैठक घेऊन सर्वेक्षणात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

...तर खपल्या निघतील

नवी दिल्ली : ‘ज्ञानवापी’मध्ये पुरातत्त्व खात्यामार्फत सर्वेक्षण करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. तसेच, सर्वेक्षण करताना वास्तूचे कोणतेही नुकसान करू नये, असे आदेशही न्यायालयाने पुरातत्त्व खात्याला दिले.

‘ज्ञानवापी-शृंगारगौरी’ प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने काल सर्वेक्षणाला परवानगी दिली होती. मात्र, या सर्वेक्षणामुळे भूतकाळात झालेल्या जखमांवरील खपल्या निघतील, असा दावा करत अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने या आदेशाविरोधात आज सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठापुढे याबाबत सुनावणी झाली.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुरातत्त्व विभागाच्या ४३ सदस्यांच्या पथकाने ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. पुढील पाच-सहा दिवस हे सर्वेक्षण सुरू राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत येथे प्रकरणाशी संबंधित फिर्यादी लक्ष्मी सिंह, सीता साहू, रेखा पाठक आणि मंजू व्यास आणि त्यांचे वकीलही उपस्थित असतील.

-मदन मोहन यादव, हिंदू गटाचे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT