Manoj Naravane Sakal
देश

लष्करप्रमुख जनरल नरवणे यांची CDS समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती

सूरज यादव

आता सीडीएस पद रिक्त असल्यानं सध्या तरी चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपद लष्कर प्रमुख जनरल नरवणेंकडे देण्यात आलं आहे.

भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत (Genral Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Helicopter Crash) मृत्यू झाला. यानतंर आता लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Genral M M Naravne) पुढचे सीडीएस (CDS) होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे ची ऑफ डिफेन्स स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. लष्कराच्या तिन्ही दलांचे जे प्रमुख असतात त्यात वरिष्ठ असणाऱ्या व्यक्तीकडे ही जबाबदारी दिली जाते. रावत यांच्यानंतर आता तिन्ही दलांच्या प्रमुखांमध्ये नरवणे वरिष्ठ असल्यानं त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लष्कराचे हवाई दल प्रमुख (Airforce Chief) एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी आणि नौदल प्रमुख (Indian Navy Chief) हरि कुमार हे नवरवणेंपेक्षा ज्युनिअर आहेत.

डिसेंबर २०१९ मध्ये पहिल्यांदा सीडीएसपदी जनरल रावत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी सीडीएस समितीचे अध्यक्षपदसुद्धा त्यांच्याकडेच देण्यात आलं होतं. त्याआधी तिन्ही दलांच्या समन्वयासाठी लष्करात चेअरमन ऑफ द चीफ ऑफ स्टाफ कमिटी पद होते. तेव्हा लष्करातील वरिष्ठ असणाऱ्या व्यक्तीकडे या पदाची जबाबदारी असायची. आता सीडीएस पद रिक्त असल्यानं सध्या तरी चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपद लष्कर प्रमुख जनरल नरवणेंकडे देण्यात आलं आहे.

सीडीएस पदावर ज्यांची नियुक्ती झाल्यानंतर नव्या सीडीएस यांच्याकडे चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यपदाची सूत्रे जातील. तिन्ही दलात सध्या वरिष्ठ असल्यानं लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचीच सीडीएस पदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

जनरल बिपिन रावत यांच्यानंतर लष्कर प्रमुख म्हणून ३१ डिसेंबर २०१९ रोजी जनरल मुकुंद नरवणे यांनी सुत्रे सांभाळली होती. ते देशाचे २८ वे लष्कर प्रमुख आहेत. त्यानंतर बिपिन रावत यांना देशाचे पहिले सीडीएस म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Novak Djokovic: जोकोविच आप्पाचा विषय लय हार्डए... विम्बल्डननेच शेअर केला मराठी गाण्यावर Video; एकदा पाहाच

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

SCROLL FOR NEXT