s-p-balasubrahmanyam
s-p-balasubrahmanyam 
देश

भारदस्त आवाजाचे गारुड 

सकाळवृत्तसेवा

गायक व संगीतकार एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी आपल्या भारदस्त आवाजाने असंख्य लोकांना मोहिनी घातली. प्रामुख्याने तेलुगू तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत काम करणारे श्रीपती पंडितराधुला बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म ४ जून १९४६ मध्ये नेल्लोरमध्ये तेलगू कुटुंबात झाला. त्यांचे वडील दिवंगत एस. पी. सांबमूर्ती हे हरिकथा कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकांतही भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे बालसुब्रह्मण्यम यांना घरूनच कलेचा वारसा लाभला. अभियांत्रिकीच्या अभ्यासानंतरही त्यांनी संगीत सुरूच ठेवले आणि विविध गायन स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार जिंकले. 

बालसुब्रह्मण्यम यांनी १ डिसेंबर १९६६ रोजी एस. पी. कोदानंदानी यांच्या ‘श्री श्री श्री मेरीदारामण्णा’ या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटात पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले. कन्नड व तमीळमध्येही त्यांनी गाण्यास सुरुवात केली. १९८० मधील ‘शंकरभरणम’ या चित्रपटाने बालसुब्रह्मण्यम यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचली. त्यांना ‘बालू’ या टोपणनावाने ओळखले जायचे. त्यांनी सोळा भाषांमध्ये हजारो गाणी गायली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘एक दुजे के लिए’ (१९८१) या चित्रपटात गाणी गाऊन त्यांनी आपली हिंदी चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीचा प्रारंभ केला. याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. १९८९ मध्ये सुपरहिट ठरलेला ‘मैने प्यार किया’ या चित्रपटासाठी अभिनेता सलमान खानसाठी त्यांनी पार्श्‍वगायन केले. ‘दिल दीवाना’ या गाण्यासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. त्यांचा उल्लेखनीय चित्रपट ठरला ‘हम आपके हैं कौन..!’. यामध्ये बालसुब्रह्मण्यम यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत गायलेले ‘दीदी तेरा देवर दिवाना’ हे गाणे लोकप्रिय ठरले. बालसुब्रह्मण्यम यांनी सुमारे दहा वर्षे सलमान खानसाठी गाणी गायली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बालसुब्रह्मण्यम यांनी ए. आर. रेहमानसाठी ‘रोजा’सह अनेक चित्रपट केले. त्यानंतर जवळजवळ १५ वर्ष ते हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर होते. विशाल-शेखर यांच्या संगीत दिग्दर्शनात २०१३ मध्ये ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाचे शीर्षक गीत रेकॉर्ड करत बालसुब्रह्मण्यम यांनी अभिनेता शाहरुख खानसाठी आवाज दिला. या चित्रपटाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतले. 

गाजलेले चित्रपट गाजली ः शंकरभरणम, एक दुजे के लिये, मैने प्यार किया, हम आपके है कौन, साजन, पत्थर के फूल,  रोजा 
या कलाकारांसाठी पार्श्वगायन कमल हसन, रजनीकांत, सलमान खान, के. भाग्यराज, मोहन, अनिल कपूर, गिरीश कर्नाड, अर्जुन सरजा, विष्णुवर्धन, नागेश, कार्तिक आणि रघुवरन. 

संगीतकारांबरोबर कामःए. आर. रेहमान, विद्यासागर, एम. एम. केरावानी, एस. ए. राजकुमार, देवा, राम-लक्ष्मण, आर. डी बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, नदीम- श्रवण, आनंद-मिलिंद 

कारकिर्दीचा गौरव 
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी सहा राष्ट्रीय पुरस्कार 
- आंध्र प्रदेशचे २५ राज्यस्तरीय पुरस्कार 
- कर्नाटक आणि तमिळनाडूचे राज्यस्तरीय पुरस्कार 
- बॉलिवूडचे फिल्मफेअर, सहा दाक्षिणात्य फिल्मफेअर पुरस्कार 
- भारत सरकारकडून २००१ मध्ये पद्मश्री आणि २०११ साली पद्मभूषण पुरस्कार प्रदान 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT