Arvind Kejriwal 
देश

Arvind Kejriwal Arrest: राहुल गांधी केजरीवालांना कायदेशीर मदत करणार; कुटुंबियांशी साधला संवाद

ईडीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीच्या अबकारी कर धोरणातील कथित आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीनं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारनं रचलेलं हे कट-कारस्थान असल्याचा आरोप आपनं केला आहे.

पण आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे केजरीवाल यांच्या मदतीला धावून गेले आहेत, त्यांना कायदेशीर मदत करणार आहेत. केजरीवालांच्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधत त्यांनी धीर देण्याचं काम केलं आहे. (arvind kejriwal arrest rahul gandhi to provide legal assistance communication with kejriwal family members)

केजरीवालांच्या अटकेनंतर राहुल गांधींनी ट्विटरवर पोस्ट केली. यामध्ये त्यांनी म्हटलं की, "घाबरलेला हुकुमशाहा एक मेलेली लोकशाही तयार करतो. मीडियासह सर्व संस्थांवर कब्जा, राजकीय पक्षांची तोडफोड, कंपन्यांकडून हप्ता वसुली, प्रमुख विरोधीपक्षांची खाती गोठवणे देखील आसुरी शक्तीसोबत हा हुकुमशाहा काम करत होता. (Latest Maharashtra News)

आता तर निवडणून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक होणं ही सर्वसाधारण बाब बनली आहे. इंडिया आघाडी याला सडेतोड उत्तर देईल" अशा आक्रमक शब्दांत राहुल गांधींनी नाव न घेता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, ईडीनं नववं समन्स पाठवूनही केजरीवाल यांनी त्याची दखल घेतली नाही. तर आपल्याला पाठवलेली सर्व समन्स ही बेकायदा असल्याचं सांगत तसेच अटकेची जाणीव असल्यानं त्यांनी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. पण कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर लगेचच ईडीनं दहावं समन्स घेऊन केजरीवाल यांच्या घरी धाव घेतली आणि दोन तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली. (Latest Marathi News)

या अटकेनंतर दिल्लीच्या मंत्री आणि आपच्या प्रवक्त्या आतिषी यांनी माध्यमांशी बोलताना हे मोदी सररकारचं कट कारस्थान असल्याचं सांगत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी केजरीवाल होते, आहेत आणि भविष्यातही राहतील असं म्हटलं आहे. त्यामुळं केजरीवालांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्याचे प्रयत्न झाले तरी त्याला आपकडून कडाडून विरोध होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT