Arvind Kejriwal sakal
देश

Arvind Kejriwal : ''अरविंद केजरीवाल 'कोमा'मध्ये जाऊ शकतात'', 'आप' नेत्याने केला दावा; केजरीवालांचं वजन होतंय कमी...

Sanjay Singh : एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये संजय सिंह म्हणाले, भाजप सरकारकडून २५ जून रोजी संविधान हत्येचा दिवस पाळला जाणार असेल तर मग ३० जानेवारी हा दिवस, ज्या दिवशी महात्मा गांधींची हत्या झाली होती तो दिवसही आणि तो प्रत्येक दिवस संविधान हत्येचा दिवस पाळला पाहिजे, जेव्हा भाजपने अनेक राज्यांमधले सरकारं पाडले होते.

संतोष कानडे

AAP News : आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरुन पुन्हा एकदा भाजपशासित केंद्र सरकावर जोरदार हल्ला चढवला. चुकीच्या प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना गोवलं असून सरकार त्यांचा छळ करत असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला.

पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना संजय सिंह म्हणाले की, २१ मार्चपासून आतापर्यंत केजरीवाल यांचं वजन साडेआठ किलोने कमी झालं आहे. ७० किलो असलेलं वजन ६१.५ किलोच्या आसपास झालं आहे. हे वजन नेमकं कमी का होतंय, याबाबत काहीही माहिती नाहीये.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अशा परिस्थितीत कुणीही कोमात जाऊ शकतं- सिंह

संजय सिंह म्हणाले की, पाच वेळा रात्री अचानक केजरीवालांची शुगर लेव्हर ५० वरुनही खाली आली. ही एक गंभीर बाब आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीमध्ये कुणी कोमामध्येही जाऊ शकतं. रात्रीच्या वेळी जेलमध्ये डॉक्टरही नसल्याचं सिंह यांनी सांगितलं.

संजय सिंह पुढे म्हणाले की, केजरीवाल यांना जेलमधून बाहेर काढून त्यांची आरोग्य तपासणी केली पाहिजे. परंतु केंद्र सरकार त्यांना जेलमधून बाहेर येऊ देत नाही. अशातच त्यांच्यासोबत कधीही होत्याचं नव्हतं होऊ शकतं.

एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये संजय सिंह म्हणाले, भाजप सरकारकडून २५ जून रोजी संविधान हत्येचा दिवस पाळला जाणार असेल तर मग ३० जानेवारी हा दिवस, ज्या दिवशी महात्मा गांधींची हत्या झाली होती तो दिवसही आणि तो प्रत्येक दिवस संविधान हत्येचा दिवस पाळला पाहिजे, जेव्हा भाजपने अनेक राज्यांमधले सरकारं पाडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT