Arvind Kejriwal esakal
देश

Arvind Kejriwal News : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ

Arvind Kejriwal Arrest : मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ झाली आहे. वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन दिला जावा, अशी विनंती केजरीवाल यांनी राउज अव्हेन्यू न्यायालयाकडे केली होती. मात्र त्यांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. केजरीवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

आपले वजन कमी झाले असून कोणता तरी गंभीर आजार झाला असण्याची शक्यता वाटत आहे. त्यामुळे वैद्यकीय चाचण्या करुन घेण्यासाठी आठवडाभराकरिता अंतरिम जामीन दिला जावा, अशी विनंती केजरीवाल यांनी केली होती. सक्तवसुली संचलनालयाने या जामीन अर्जाला विरोध केला होता. केजरीवाल सलग निवडणूक प्रचार करीत होते, मात्र जेव्हा आत्मसमर्पण करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी वैद्यकीय कारण सांगितले. एकप्रकारे केजरीवाल न्यायालयाची दिशाभूल करीत असल्याने त्यांना जामीन दिला जाउ नये, असा युक्तिवाद ईडीकडून गत आठवड्यात करण्यात आला होता.

उभय बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती कावेरी बावेजा यांनी निकाल राखून ठेवला होता. तो निकाल आज त्यांनी दिला. केजरीवाल यांना सुनावणीदरम्यान आभासी मार्गाने हजर करण्यात आले होते. दरम्यान विशेष न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्याचे संकेत केजरीवाल यांच्या वकिलांनी दिले आहेत. केजरीवाल यांना गत 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला होता. निवडणुकीत प्रचार करण्यासाठी त्यांना जामीन देत असताना 2 जून रोजी आत्मसमर्पण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भयानक सत्य उघड! प्राणी, वृद्ध महिला आणि स्वतःच्या मुलीलाही सोडलं नाही... नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या विकृत कृत्यांचा इतिहास समोर

Thane: ठाण्यात पाणीकपात लागू, पाणीपुरवठा महिन्यातून दोनवेळा बंद, कुठे आणि कधी?

टोळक्यानं भररस्त्यात गाठलं; काठी, कोयता आणि दगडाने तब्बल ३५ वार, सोलापुरात तरुणाला क्रूरपणे संपवलं, भयंकर कारण समोर

Latest Marathi News Live Update : समता पतसंस्थेच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता

Kabaddi: भारतीय नौदलाचा 'बंड्या मारुती' चषकावर कब्जा! भरत हुडा ठरला १ लाखाचा मानकरी; फायनलमध्ये यु.पी. योद्धाचा धुव्वा

SCROLL FOR NEXT