Arvind Kejriwal Google file photo
देश

Arvind Kejriwal : ''मद्य घोटाळ्यातील पैशांचा वापर गोवा निवडणुकीसाठी'', ईडीनंतर सीबीआयच्या तपासातही झालं स्पष्ट

कथित गैरव्यवहारात ‘आप’ला बराच पैसा मिळाला असून त्यापैकी ४५ कोटी रुपये या पक्षाने गोव्यातील प्रचारासाठी खर्च केल्याचा ‘ईडी’चा आरोप आहे. सोन्याचा व्यवहार करणाऱ्या पाच ‘अंगडिया’ कंपन्यांच्या जबाबातही या पैशांचा माग लागतो, असे ‘ईडी’चे म्हणणे आहे.

सकाळ वृत्तसेवा

Arvind Kejriwal News : दिल्लीतील मद्यधोरणातील कथित गैरव्यवहारातून मिळालेल्या ४५ कोटी रुपयांचा वापर आम आदमी पक्षाने गोव्यामध्ये २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी केल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला होता. याच प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग आणि प्राप्तिकर विभागाने स्वतंत्रपणे केलेल्या तपासातही ही बाब दिसून आली असल्याचा दावा ‘ईडी’ने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये करण्यात आला आहे.

दिल्ली सरकारच्या मद्यधोरणात मोठा गैरव्यवहार असून यामध्ये हवाला नेटवर्कशी संबंधित काही जणांची आणि काही ‘अगडियां’ची ‘ईडी’ने चौकशी केली असून तपासाचाच एक भाग म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

या गैरव्यवहारात ‘आप’ला बराच पैसा मिळाला असून त्यापैकी ४५ कोटी रुपये या पक्षाने गोव्यातील प्रचारासाठी खर्च केल्याचा ‘ईडी’चा आरोप आहे. सोन्याचा व्यवहार करणाऱ्या पाच ‘अंगडिया’ कंपन्यांच्या जबाबातही या पैशांचा माग लागतो, असे ‘ईडी’चे म्हणणे आहे. या प्रकरणात केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हे ‘आप’चे दोन मोठे नेते आणि भारत राष्ट्र समितीच्या आमदार के. कविता हे प्रमुख आरोपी आहेत.

या प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असा ‘आप’च्या नेत्यांचा दावा आहे. मात्र, या गैरव्यवहाराचे पुरावे प्राप्तिकर विभाग आणि सीबीआय यांनी केलेल्या चौकशीतही आढळून आले असल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे.

‘ईडी’ने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांतील माहितीनुसार, दिल्लीतील मद्य व्यवसायात प्रवेश मिळविण्यासाठी दक्षिणेतील काही नेत्यांनी आणि व्यावसायिकांनी ‘आप’ला शंभर कोटी रुपये दिले. त्यापैकी ४५ कोटी रुपये ‘आप’ने गोव्यातील २०२१-२२ च्या निवडणुकीसाठी वापरले. हवाला मार्गाचा अवलंब करणाऱ्या काही ‘अंगडिया’ कंपन्यांची चौकशी केली असता या ४५ कोटी रुपयांचा माग लागल्याचे आणि प्राप्तिकर विभागाने त्यावेळी केलेल्या चौकशीमध्येही हे सिद्ध झाल्याचे कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT